आरक्षण संपवण्यासाठी चार मुख्य पक्ष एकत्र; आंबेडकरांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा चर्चेत आहे. याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आरक्षण कायमचं संपलं पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना (UBT) आणि भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला. ते जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडीच्या जागांची अदला-बदल होणार… शरद पवारांनी दिले संकेत
विधानसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून निवडणुका याच मुद्द्याभोवती फिरतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष दिलं नाही, त्यामुळं तो प्रश्न अद्याप सुटू शकला नाही. आता आरक्षणाचा मुद्दा कळीचा मुद्दा बनला आहे. ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. ओबीसींच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे, असं त्यांनी म्हटलं.
Emergency: ‘इमर्जन्सी’तील कटवर कात्री चालवल्यास मिळू शकतं प्रमाणपत्र, CBFC चा न्यायालयात जबाब
आरक्षणाच्या मुद्द्यावरच निवडणुका होणार
रत्नागिरीच्या सभेत शरद पवार यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा देत ती योग्य असल्याचे सांगितले. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीचीच आहे, असं स्पष्ट होतं. ओबीसींचे आरक्षण हे फक्त ओबीसींसाठीच राहिले पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये. ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर वेगळे आरक्षण द्यावे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभा निवडणूक लढली जाईल, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी, महागाई हे प्रश्न मागे पडत चालले, असं आंबेडकरांनी म्हटलं.
पुढं ते म्हणाले, आघाड्यांचे राजकारण हे चालत राहील. आरक्षण कायमचं संपले पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष एक आहेत. आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल आणि रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचं धोरण आणणार आहे. या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे. ज्यांना आरक्षण मिळते, ते एका बाजूला त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरक्षण संपले पाहिजे, अशी भूमिका घेतली. ओबीसी घटक आरक्षण वाचलं पाहिजे याचं नेतृत्व करणार व मराठा समाज आरक्षण विरोधी नेतृत्व करणार, असं त्यांनी यावेळी म्हटलं.