धक्कादायक! मंगेशकर रुग्णालयाने थकवला महापालिकेचा 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स; नवी माहिती उघड..

धक्कादायक! मंगेशकर रुग्णालयाने थकवला महापालिकेचा 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स; नवी माहिती उघड..

Dinanath Mangeshkar Hospital : विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा पैशांअभावी उपचार केले नसल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी दिनानाथ रूग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) प्रशासनावर केला होता. त्यानंतर मोठा राडा पाहण्यास मिळाला. यानंतर आता याच रुग्णालयाबाबत आणखी धक्कादायक माहिती हाती आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा प्रॅापर्टी टॅक्स थकवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने याच रुग्णालयाला एक रुपया नाममात्र दरात जमीन देण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेतला आहे.

पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, (Pune News) असा आरोप केला जात आहे. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणण्यात आलं होतं. परंतु उपचारासाठी पैशांची अडवणूक करण्यात आली होती. दहा लाख रूपयांची मागणी केली होती. यामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. या घटनेमुळं संपूर्ण राज्यभरात संतापाचं वातावरण आहे.

अजित पवार गटाचे आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने रूग्णालय प्रशासनावर सवाल उपस्थित होत आहेत. यावर बराच गदारोळ सुरू आहे. मयत महिलेचे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. यानंतर रुग्णालय प्रशासनानेही आपली बाजू मांडली आहे. प्रशासनाच्या कामकाजाबाबत समितीचा अहवाल समोर आला आहे. तरीदेखील हा वाद थांबलेला नाही.

ब्रेकिंग : रूग्णांकडून डिपॉझिट रक्कम घेणार नाही; तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रूग्णालयाचा निर्णय

यानंतर राजकीय पक्षांनीही यात उडी घेत रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काल येथे शिवसेनेने आंदोलन केले होते. तर आज महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकारानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून आता अनामत रक्कम घेणार नाही असा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच या रुग्णालयाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या रुग्णालयाने सन 2019 पासून पुणे महापालिकेकडे मालमत्ता करच भरला नसल्याची माहिती हाती आली आहे.  2019 पासून म्हणजेच सहा वर्षांचा मालमत्ता कर थकीत आहे. या थकीत कराची रक्कम जवळपास 27 कोटी 38 लाख रुपये इतकी होते. रुग्णालयाने इतके दिवस कर का भरला नाही, महापालिकेनेही वसुलीसाठी काही प्रयत्न केले नाहीत का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. थकीत मालमत्ता कराची ही रक्कम जास्त आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube