‘एक हार से कोई फकीर नहीं बनता, और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता’, बावनकुळेंचा मविआवर घणाघात

‘एक हार से कोई फकीर नहीं बनता, और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता’, बावनकुळेंचा मविआवर  घणाघात

BJP Chintan Meeting : भाजपच्या चिंतन बैठकित बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला. 2019 ला उद्धव ठाकरेंनी जनमताचा अपमान करत भाजपच्या पाठित खंजीर खुपसला असा थेट प्रहार त्यांनी यावेळी केला. आजपासून (BJP) पुण्यात भाजपचं अधिवेशन आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. दरम्यान, संपूर्ण अडीच वर्षाच्या काळात दोनवेळा उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले असा हा पेन सोबत न ठेवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला अशी खोचक टिकाही बावनकुळे यांनी यावेळी केली.

आम्ही चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागेल; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार

मान्यवर उपस्थित

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचं महाअधिवशेन होत आहे. आज या अधिवेशनाला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते, मंत्री या अधिवेशनाला उपस्थित आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव, पीयूष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा यांचीही अधिवेशनाला उपस्थिती आहे.

खरे मारेकरी उद्धव ठाकरे आता परवानगीची गरज नाही; मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश

या अधिवेशनात भाषण करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सलग २० रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो, की तब्येतीची काळजी घ्या मात्र, त्यांनी त्यासाठी काम केलं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारला ते वाचवता आलं नाही त्यामुळे आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच आहेत असा थेट आरोपच बावनकुळे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube