“..तर राज्य सरकार अन् शिवप्रेमी सु्द्धा माफ करणार नाही”, फडणवीसांचा इशारा कुणाला?

“..तर राज्य सरकार अन् शिवप्रेमी सु्द्धा माफ करणार नाही”, फडणवीसांचा इशारा कुणाला?

Devendra Fadnavis : काही अभिनेत्यांकडून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. विकिपीडियावरही वादग्रस्त मजकूर टाकण्यात आला होता या घटना समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आक्रमक भूमिका घेत अशा लोकांना राज्य सरकार कधीच माफ करणार नाही असा इशारा दिला. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. पण अशा प्रकारे जर कुणी वागत असेल तर सरकार माफ करणार नाहीच शिवप्रेमी देखील त्यांना माफ करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

फडणवीस पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. अठरापगड जातींना एकत्रित करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्य कारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्य कारभार करत आहोत.

डॉ. शिंदेंचा वैद्यकीय कक्षातून शह? गुगली प्रश्नावर CM फडणवीसांचं सेफ उत्तर..

दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यातील कार्यक्रमाला नाहीत यामागे कारण आहे. त्या दोघांचेही वेगवेगळे कार्यक्रम होते. ते माझ्याबरोबर पुण्यापर्यंत आले होते. त्यानंतर पुढे आपापल्या कार्यक्रमांना गेले असे फडणवीस एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले.

छावा चित्रपट राज्यात करमुक्त होईल का असे विचारले असता फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. छत्रपती संभाजी महाराजांवर अतिशय चांगला इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता ऐतिहासिक सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्याबद्दल मी सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचे मनापासून अभिनंदन करतो. हा चित्रपट करमुक्त करा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण महाराष्ट्रात 2017 मध्येच करमणूक कर कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याकडे चित्रपटावर कर नाही.

आमदार मंत्र्यांना भेटला तर फरक पडत नाही; धस-मुंडे भेटीवर फडणवीसांनी मौन सोडलं

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube