Chitra Wagh राष्ट्रवादीवर का भडकल्या ?
पुणे : शहर राष्ट्रवादी (NCP) उपाध्यक्ष दयानंद इरकल (Dayanand Irkal) यांनी रस्त्यानं जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ तसेच किळसवाणे स्पर्श करत मारहाण केल्याची घटना घडलीय. यासंदर्भात भाजपा (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच इरकल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केलीय.
दयानंद इरकल यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ आणि स्पर्श करत मारहाण केल्याची घटना काल रात्री ही घडली होती. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षे तरुणीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल रात्री पावणे ९ च्या सुमारास घडली.
BBC : तेव्हा इंदिरा गांधींनी घातली होती बीबीसीवर बंदी, वाचा सविस्तर
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी तरुणी ही काल रात्री पुण्यातील एस बी रोड वरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी ( एम एच १२ डी डब्ल्यू ०००१) वाहनाला तिने हॉर्न दिला.
हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या तरुणीला विनयभंग केला तसेच गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकरले तसेच हाताने आणि चापलेनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर २ जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पुण्यात वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. वकील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना अटक करण्यात आली आहे.