जैन बोर्डिंगचा विषय मिटवा अन् मंत्रिपद वाचवा; फडणवीसांची मोहोळांना समज, धंगेकरांनी सगळंच सांगितलं…

पुण्यातील जैन बोर्डिंगचा विषय मिटवा अन् मंत्रिपद वाचवा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना दिल्याचा दावा रविंद्र धंगेकरांनी केलायं.

Devendra Fadanvis

Ravindra Dhangekar : जैन बोर्डिंगचा विषय मिटवा अन् मंत्रिपद वाचवा या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना समज दिल्याने ते जैन बोर्डिंग हाऊसला गेले असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. दरम्यान, जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करावी, अन्यथा मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीचे पत्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय. एवढंच नाही तर मागणी मान्य न केल्यास उद्यापासून धरणे आंदोलन करणार असल्याचंही धंगेकरांनी सांगितलंय. त्यामुळे फडणवीसांनी मोहोळ यांना समज दिली आणि मोहोळ काल जैन बोर्डिंग हाऊसमध्ये गेले असल्याचा दावा धंगेकरांनी केलायं.

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; PA खासदारांना फोन लावून द्यायचे अन्…; भावाचे खळबळजनक दावे

पुढे बोलताना धंगेकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना बोलावून घेतलं. तुम्हाला हा विषय मिटवायचा की नाही असं फडणवीसांनी सक्त सांगितलं. जर तुमचा विषय मिटला नाही, तर तुम्हाला मंत्रि‍पदापासून लांब रहावं लागेल, हा सल्ला फडणवीसांनी मोहोळ यांना दिला त्यामुळेच मोहोळ जैन बोर्डिंग हाऊसमध्ये नतमस्तक होऊन शब्द दिला आहे. मोहोळ यांनी हा एक केविलवाणा प्रयत्न केला असून असला खासदार मी याआधी पाहिला नाही, या खासदाराची अवस्थाच वाईट झाली असल्याचंही धंगेकर म्हणाले आहेत.

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा, आणि जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होण्याच्या मागणीसाठी माजी आमदार, शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकरांनी बेमुदत धरणे आंदोलनाचं हत्यार उपसलंय. उद्यापासून दि. 27 ऑक्टोबरपासून धंगेकर आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला वेगळं वळण लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे धंगेकरांचे आरोप तर दुसरीकडे मंत्री मोहोळ यांनी काल जैन मुनींची भेट घेतली आहे. आंदोलनाबाबत धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्याकडून वारंवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. अशातच आज खासदार मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच जैन बोर्डिंग या ठिकाणी गेले होते. जैनमुनी यांचा जो काही जागेचा मुद्दा आहे तो बाजूला राहून माझ्यावर फार वाईट पद्धतीने आरोप झाले. परंतु, जैनमुनी किंवा त्यांच्या संबंधित लोकांनी माझं कधीही नाव घेतलं नाही. बाकी लोकांनी मात्र, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे राजकारण करत आहेत. परंतु, जैनमुनींनी मला बोलावलं होत त्यामुळे मी गेलो. त्यांनी माझ्याकडून त्यांना सहकार्य व्हाव ही अपेक्षा व्यक्त केली. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांना मी सहकार्य करेल असं आश्वासन दिलं असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअप सर्वेलन्सवर टाकलेत; चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक विधान…

दरम्यान, या व्यवहार प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असतानाही धंगेकर आंदोलनाला बसणार आहेत. एवढचं नाही तर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेऊन सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता या रविंद्र धंगेकर आंदोलनाला बसल्यानंतर हे प्रकरण कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us