Cricketer Kedar Jadhav यांचे वडील अखेर सापडले…

Cricketer Kedar Jadhav यांचे वडील अखेर सापडले…

पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे सकाळपासून पुण्यातून बेपत्ता झाले होते. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्याने पोलिसांची पाच पथकं महादेव जाधव यांचा कसून शोध घेत होते. अखेर मुंढवा पोलीस स्टेशनजवळ ते रात्री उशिरा सापडले आहेत. ते मुंढवा पोलील स्टेशनपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव यांचे (वय ७५, रा. प्लॅट नं. ००२, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. तसेच त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथकं नेमण्यात आली होती.

Ajit Pawar यांचा राज्य सरकारला इशारा… अन्यथा लोकं रस्त्यावर उतरतील! – Letsupp

महादेव जाधव हे आज सकाळी साडेअकरा वाजता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. मात्र, बारा दुपारी वाजताच्या सुमारास ते कर्वेनगर येथील कोकण एक्सप्रेस हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच त्यांच्याजवळचा मोबाईल देखील बंद येत आसल्याने कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार अलंकार पोलील स्टेशनमध्ये दिली.

पुण्यातील कोथरूड परिसरात केदार जाधव हे त्यांच्या कुटुंबियासह वास्तव्यास आहेत. त्यांचे वडिल महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंश (डिमेंशिया) हा आजार आहे. त्यामुळे त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. आजारपणामुळे ते नेहमीच घरी असतात. जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत. मात्र, सोमवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास ते गेटजवळ फेऱ्या मारत असताना तेथून ते बेपत्ता झाले. आजूबाजूच्या परिसरात त्यांचा बराच शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही.

(230) Ravindra Dhangekar | धंगेकर म्हणतात पालकमंत्र्यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube