राजकीय निर्णयात धरसोडवृत्ती घातक तरीही साहेबांचा..,; दादांनी सांगितली अंदर की बात

राजकीय निर्णयात धरसोडवृत्ती घातक तरीही साहेबांचा..,; दादांनी सांगितली अंदर की बात

Ajit Pawar News : राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक, तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar News) यांनी शरद पवार (Sharad pawar) यांच्याबद्दल भाष्य करीत अंदर की बात सांगितलीयं. दरम्यान, शिरुर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ केंदूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत सभा गाजवली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लीपवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाले, धनंजय मुंडेंनी …

अजित पवार म्हणाले, 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी असताना ती पवार साहेबांनी नाकारली. सोनिया गांधीचा परदेशीचा मुद्दा पुढे करीत पवार साहेबांनी कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे सन 2019 मध्ये भाजपासोबत जायचे ठरले आणि त्यांनी माघार घेतली. या धरसोडीमध्ये मी शेवटी भाजपासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि 72 तास उपमुख्यमंत्रीही झालो. राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक, तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता, म्हणूनच मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

…तर असे निर्णय घेतले असते का?
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर असे धरसोडीचे निर्णय त्यांनी घेतले असते का? याचे उत्तर मलाही समजत नाही. या सर्व घडामोडींना वैतागूनच अखेर मी निर्णय घेतला. आज तुमच्यापुढे मी उभा आहे. वयाच्या साठीनंतर तरी आम्हाला आमचे निर्णयाचे स्वातंत्र यामुळे मिळाले एवढेच सांगतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

बारा गावांना दुष्काळमुक्त करणार ;
शिरुर मतदारसंघातील बारा गावांचा दुष्काळ संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढला असून दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नाने सर्व्हेक्षणाचे आदेशही निघाले आहेत. त्यामुळे बारा गावांचा दुष्काळ मी संपवणार असून शिवाजीराव आढळरावांना विजयी करा, असं आवाहन अजित पवार यांनी जाहीर सभेत केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube