तंत्रज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यायला हवा; संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

तंत्रज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यायला हवा; संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

Defense Minister Rajnath Singh : पुण्यामध्ये DIAT अर्थात Defence Institute of Advanced Technology चा 12 वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

मल्लिकार्जुन खर्गेंना बजरंग दलाचे वक्तव्य भोवले, पंजाब कोर्टाची नोटीस

संरक्षणमंत्री म्हणाले की, जगात खूप गतीने बदल होत आहे. संरक्षण विभागातही अनेक टेक्निकल बदल होत आहेत. अनेक समस्या तशा संरक्षण विभागातही वाढल्या आहेत. यामध्ये सायबर स्पेसचे धोके वाढले आहेत. आपण नेहमी रिसर्च आणि विकासाला महत्व देतो, आपलं रिसर्च डीआरडीओ आहे.

DIAT या संस्थेने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले आहे. देशात आर्थिक, सामाजिक बदल घडत आहेत. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञानामुळे युद्ध कौशल्य बदलत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये युद्धाच्या पद्धती बदलत आहेत. आता काही नव्या पद्धती सायबर किंवा स्पेस वॉर येत आहेत. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहून तंत्रज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यायला हवा, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

जग ज्या पद्धतीने धावत आहे तसे आपणही गती घ्यायला हवी आहे. आपल्या मोबाईलमध्ये असलेले जीपीएस संरक्षणासाठी बनविण्यात आले होते पण आता सर्व ठिकाणी हे वापरताना दिसत आहेत. प्लास्टिक सेक्टर पण तसेच त्याचाही वापर सामान्य नागरिक ही करु शकत आहे.

संरक्षणमंत्री म्हणाले की, संशोधन वाढवावं लागणार आहे. त्याचा संरक्षण आणि संस्थेला फायदा होईल. DIAT ने आपल्या स्थापनेपासूनच संशोधन आणि प्रशिक्षणात खूप चांगलं काम केलं आहे. यामध्ये आता आणखी संशोधन होणं गरजेचं आहे.

आपल्या संरक्षण संशोधनात वाढ करायला हवी, तर याचा सर्वसामान्य नागरिकांना देखील उपयोग होईल, सेल्फ रिलायन्स हे अतिशय महत्वाचं आहे. संपूर्ण जग विलेज ग्लोबल व्हिलेज बनलं आहे. भारतासारखा देश इम्पोर्टवर अवलंबून राहू शकत नाही, असंही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

देशासाठी आपल्याला संरक्षण संसाघनं बनवता आली पाहिजेत. आपण अनेक देशांना संसाधनं देत आहोत. तसेच 16 हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीचे संसाधनं आपण एक्सपोर्ट करतो. रायफलपासून ब्रम्होसपर्यंत सगळं आपण बनवतो.

आर्थिक स्थितीप्रमाणे आज आपण टॉप 5 मध्ये आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल असा विश्वास यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube