मोठी बातमी : तत्काळ कोठडीची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

  • Written By: Published:
मोठी बातमी : तत्काळ कोठडीची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी  IAS अधिकारी पूजा खेडकरला (Puja Khedkar) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पूजा यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता पूजा खेडकर यांची अटक 21 ऑगस्टपर्यंत टळली आहे. याशिवाय कोर्टाने दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस बजावली असून, पूजा खेडकरची कोठडी का आवश्यक आहे याचे उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांनी हे आदेश दिले आहेत.  (Delhi High Court Orders Delhi Police Not To Arrest Puja Khedkar Till August 21)

पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द

पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. खासगी कारला दिवा लावल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकरची शिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. त्यानंतर पूजाचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आलं.

आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण महायुतीला मतदान करा; अजितदादांचे मंत्री हे काय बोलले!

पूजा खेडकरचा जामीन फेटाळला…

दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखा तिला अटक करू शकत नाही, यासाठी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तिचा जामीन कोर्टाने फेटाळूल लावला होता. त्यानंतर आता खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्दश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

वडील दिलीप खेडकरही गोत्यात; गुन्हा दाखल

ही दिवसांपासून चर्चेत असलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्याविरुद्ध गुरुवारी (ता. 8) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल पाठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

video: पुणेकराने थांबवली आमदाराची गाडी; सायरन वाजवला म्हणून झाप झाप झापलं; पाहा व्हिडिओ

दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध आयपीसी कलम 186, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असताना, दिलीप खेडकर यांनी कथितरित्या कार्यालयाला भेट दिली आणि जूनमध्ये पूजा खेडकरसाठी वेगळी केबिन मिळावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी वाद घातला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube