आरोग्यमंत्र्यांविरोधात आरोप करणाऱ्या डॉ. पवारांचे निलंबन का झाले ? आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

  • Written By: Published:
आरोग्यमंत्र्यांविरोधात आरोप करणाऱ्या डॉ. पवारांचे निलंबन का झाले ? आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

Dr. Bhagwan Pawar suspension, clarification from health department : पुणे महानगरपालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार (Bhagwan Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एक पत्र लिहून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरचे कामे व इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला होता. नियमबाह्य कामे केले नाही म्हणून जुन्या कामांमध्ये चौकशी समिती नेमून निलंबित केल्याचा आरोप डॉ. भगवान पवार यांनी केला होता. तानाजी सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले. तर आता आरोग्य विभागाने पवार यांना निलंबित का केले, याची तपशीलवर माहिती दिली आहे.

Video : विधानसभेतही खटपट होणारच; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांनी दिलं उत्तर

सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक छळ आदीं विविध तक्रारी प्राप्त होत्या. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेतली आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सुजय विखे बाजी मारणार पण लीड घटणार…, राम शिंदे असं का म्हणाले?

डॉ. पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबार येथे मुख्यालय देण्यात आले आहे. या चौकशी दरम्यान त्यांना आणि संबंधित तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी आहे.

डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे यासह आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप शासनास प्राप्त झाले होते. सतत तक्रारी प्राप्त होत असल्याने २९ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती.

पवार यांच्याविरुद्धच्या तक्रारींचे गंभीर स्वरुप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार त्यांचे निलंबन करणे आवश्यक आहे अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यांच्यावर चौकशी समितीने विविध आरोप ठेवले आहे.

पुढील सविस्तर चौकशी व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज