पुण्यातील ग्रंथालयाला भीषण आग; फर्निचर, लॅपटॉप जळून खाक

पुण्यातील ग्रंथालयाला भीषण आग; फर्निचर, लॅपटॉप जळून खाक

Pune News : पुणे शहरातील नवी पेठ परिसरातील गांजवे चौक येथे एका ग्रंथालयाला अचानक आग लागली. या परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर हे ग्रंथालय आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची वाहने तत्काळ दाखल झाली आणि त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. बराच काळाच्या मेहनतीनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे काचा गरम होऊन , खिडकीच्या आणि इतर काचेच्या वस्तू फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून काम सुरू आहे.

या ग्रंथालयाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. आगीमध्ये ग्रंथालयातील फर्निचर पुस्तके आणि लॅपटॉप इतर सामान जळून खाक झाले आहे. सध्या येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती अग्निशमन दल अधिकारी राजेश जगताप यांनी दिली. आगीचं नेमकं कारण अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तपासातून समजेल. परंतु विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि नोट्स या आगीत जळाल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान झाले आहे.

नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश

ग्रंथालय इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. आग कशामुळे लागली याची माहिती अजून समोर आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. आगीमुळे परिसरात मोठा धूर पसरला होता. नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती मिळताच भाजप नेते धीरज घाटे येथे हजर झाले. काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या घटनेच्या तपासानंतर आगीचं नेमकं कारण काय होतं याचा खुलासा होऊ शकेल. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणा असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत अग्नितांडव! भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; झोपेतच काळाने गाठलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube