मला चाळीस वर्षांचा पुण्यातला अनुभव; प्र.क्र 41 मधून विजय होण्याचा राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार इनामदार यांना विश्वास
माझ्या भागातील लोक माझ्या कामावर समाधानी आहेत. आजही कुणीही प्रभाग क्रमांक 41 मध्ये जाव आणि लोकांना विचाराव.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Pune) जोरदार प्रचार सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक 41 ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फारुख इनामदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना प्रभाग क्रमांक 41 साठी विकासाचं व्हिजन मांडलं आहे.
सर्वात महत्वाचं काम जे आहे ते माझ्या दृष्टीने डीपीरोड करायचा आहे. या कामतून मोठी कनेक्टीवीटी देण्याच काम मी केलं असं इनामदार म्हणाले. तसंच, जर मला पु्न्हा संधी मिळालीच तर, माझ्या परिसरात पाण्याची आणि वाहतुकीची समस्यांवर मी काम करणार आहे. डीपी रोड व्यवस्थित करणार. मोठ्या व्यासाची पाईपलाईन लष्कर पाणी पुरवठ्यातून राम टेकडीला आणून वितरण करणार. होळकरवाडी, औताडवाडी वडाचीवाडी या भागाला पुरवठा करणार आणि हा सगळा जलप्रकल्प करून संपूर्ण पाणीप्रश्न सोडवणार आहे असंही ते म्हणाले.
मुस्लिम, दलित, ख्रिश्चन आणि मराठा समाज मला मतदान करणार; फारुख इनामदार स्पष्टच म्हणाले
या परिसरातील लोकांनी म्हणजे डीपीरोड, भाजी मार्केट या भागातील लोक माझ्या कामावर समाधानी आहेत. आजही कुणीही प्रभाग क्रमांक 41 मध्ये जाव आणि लोकांना विचाराव. येथील सगळेच लोक माझ्या कामावर समाधानी आहेत. दरम्यान, या भागातील अनेक गरीब लोकांच्या जागा, दुकाण काही टोळक्याने लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावर मी आवाज उठवला, काही लोकांना कोर्टात जाण्यासाठी सांगितलं. आणि यातून लोकांची सुटका केली असंही इनामदार यावेळी म्हणाले.
मी याच भागातील स्थानिक व्यक्ती आहे. त्यामुळे या भागातील समस्या मला माहिती आहे. इथं शिक्षण केलेल्या व्यक्तीला काही काम नव्हत. मी निवडणुकीच्या कामात स्लीपा लिहण्याचं काम केलं. हे काम 9 वी पासून केलं आहे. विठ्ठलराव गाडगीळ, माजी आमदार के.टी गिरमे, विठ्ठल तुपे, बाळासाहेब शिवरकर या सगळ्या लोकांचं काम पाहत आलो आहे. यातून मला आवड निर्माण झाली. पोस्टर लावण्यापासून मी काम केलं आहे, आता ही आयुष्यातील 3 री निवडणूक आहे असंही इनामदार यावेळी म्हणाले.
