माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या कारचा अपघात; दुचाकी अन् कारची धडक

Raosaheb Danve : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबाबतीत (Raosaheb Danve) मोठी बातमी समोर आली आहे. दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगात त्यांच्या कारला धडकला अशी माहिती समोर येत आहे. हा अपघात लोणावळ्यातील जयचंद चौकात घडला. सुदैवाने या अपघातात कुणलाही दुखापत झाली नाही. यानंतर या दुचाकीस्वार आणि दानवे यांच्यात काही काळ वादही झाल्याचे सांगण्यात येते. वाद वाढत असल्याचे पाहताच स्थानिकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.
या अपघातात दानवे यांची कार अपघातग्रस्त झाली. यानंतर एका रिक्षाचालकाच्या मदतीने रावसाहेब दानवे आपल्या इच्छित स्थळी गेले. ज्यावेळी वाद सुरू होता तेव्हा काही स्थानिकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे मंत्री आहेत तेव्हा वाद शांत झाला. स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकाने मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तसेच हा वाद जास्त वाढू नये अशी समंजसपणाची भूमिका माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली.
बुलढाण्यात तिहेरी अपघात! 5 प्रवाशांचा मृत्यू, 24 जण जखमी; बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा
रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.