पुणे माजी उपमहापौराच्या सुपुत्राची मुजोरी; कारला धक्का लागला म्हणून दुचाकी चालकाला मारहाण

  • Written By: Published:
पुणे माजी उपमहापौराच्या सुपुत्राची मुजोरी; कारला धक्का लागला म्हणून दुचाकी चालकाला मारहाण

Aba Bagul Son Beats Up a young man : राजकारण्यांचा माजुरडेपणा आपण पाहिला असेलच. आता त्यांच्या मुलांचाही समोर येत आहे. पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Beats ) याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारानं केली आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी शेपूट घातलं. त्यानंतर तक्रारदारानं पोलीस आयुक्तांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला.

पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश; पाचजण अटक, 10 लाख 35 हजार रुपये जप्त

आबा बागुल यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नाही, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांनी आपल्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. हेमंत बागुल यांनी आपल्याला जीवं मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार फय्याज सय्यद यांनी बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

यावर हेमंत बागुल यांनी खुलासा केला आहे. ‘माझे वाहन सिग्नल लागल्याने थांबलेले असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून त्या व्यक्तीने माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यातून त्याला जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. त्याने दादागिरी करुन शिवीगाळही केली. त्यातून हे घडलं. ज्यावेळी त्याला कळलं की मी आबा बागुल यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने प्रसिद्धीपोटी किंवा प्रतिमा मलीन करण्यासह आर्थिक लाभापोटी हा खटाटोप केला आहे, असं हेमंत बागुल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube