काय सांगता! पनीरपेक्षाही स्वस्त चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट; किंमत ऐकून व्हाल थक्क!

काय सांगता! पनीरपेक्षाही स्वस्त चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट; किंमत ऐकून व्हाल थक्क!

Champions Trophy Pakistan : फेब्रुवारी महिन्यातील 19 तारखेपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला (Champions Trophy) सुरुवात होत आहे. पहिलाच सामना कराची शहरात होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने (Team India) दुबईत होणार आहेत. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षक येतील. त्यांच्यासाठी तिकिटाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या सामन्यांसाठी अद्याप तिकिटांचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने तिकिटांचे जे दर निश्चित केले आहेत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण आपल्या भारतात एक किलो पनीरची किंमत सुद्धा यापेक्षा जास्त आहे. भारतात एक किलो पनीर जवळपास 400 रुपयांना मिळते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्वात (Pakistan Cricket Board) स्वस्त तिकीट 1000 पाकिस्तानी रुपये किमतीचे ठेवले आहे. भारताच्या चलनात पाहिले तर हे तिकीट फक्त 310 रुपयांत मिळेल. पीटीआय वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट्सनुसार कराची, लाहोर आणि रावळपिंडी शहरात होणाऱ्या सामन्यांचे सर्वात कमी किमतीचे तिकीट 1000 पाकिस्तानी रुपये आहे.

Asian Champions Trophy 2024: चीनचा धुव्वा उडविला; भारत पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन

दुसरीकडे रावळपिंडी मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात (Bangladesh) होणाऱ्या सामन्याचे तिकीट 2 हजार पाकिस्तानी रुपयांना मिळेल. भारतीय चलनात या तिकीटाची किंमत 620 रुपये इतकी होईल. या व्यतिरिक्त सेमी फायनल सामन्याचे तिकीट 2500 पाकिस्तानी रुपयांपासून (776 भारतीय रुपये) सुरू होईल.

व्हीआयपी तिकिटासाठी इतके पैसे

या स्पर्धेतील सर्व व्हीआयपी सामन्यांचे तिकीटाची किंमत 12 हजार पाकिस्तानी रुपये (3726 भारतीय रुपये) निश्चित करण्यात आली आहे. परंतु चाहत्यांना या तिकिटासाठी 25 हजार रुपये देखील खर्च करावे लागू शकतात. याव्यतिरिक्त प्रीमियर गॅलरी तिकिटांची किंमत वेगळी असू शकते. कराचीत प्रीमियर गॅलरीचे तिकीट 3500 पाकिस्तानी रुपयांना मिळेल. लाहोरमध्ये 5000 तर रावळपिंडीमध्ये गॅलरी तिकिटासाठी 7000 हजार पाकिस्तानी रुपये मोजावे लागतील.

दुबईत किती सामने होणार

या स्पर्धेसाठी 8 संघाना दोन गटात विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्युझीलंड आणि बांगलादेश आहे तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज आहेत. भारतीय संघ साखळी फेरीत ग्रुप ए मधील बाकीच्या तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. यानंतर भारतीय संघ जर सेमी फायनल राऊंड मध्ये पोहोचला तर सेमी फायनल सामना देखील दुबईत होईल. तसेच जर भारतीय संघ फायनल मध्ये पोहोचला तरी हा सामना सुद्धा दुबईतच होईल.

Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube