‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर..? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
पुणे : कसबा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना खात्री नव्हती. खुद्द शरद पवार यांनी याबद्दलची माहिती दिली. पवारांना कसब्यात यश येणार नाही. असं का वाटलं? याची माहितीही शरद पवार यांनी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी फडणवीसांची (Devendra Fadnavis) खिल्ली उडवली.
कसब्यात यश मिळणार असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण त्यांना त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. यामुळे कसब्यात विजय होणार की नाही याची खात्री नव्हती. हे मुख्य कारण बनलं होत. कसब्यामध्ये गिरीश बापट यांनी अनेक वर्ष त्याठिकाणी प्रतिनिधीत्व केलं होतं. ते लोकांमध्ये कायम असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. यामुळेच त्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असं वाटत होतं, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी विधानसभेला २०० आणि लोकसभेला ४० जागा निवडून येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याविषयी पवारांना विचारण्यात आलं. त्यावर, संजय राऊत पत्रकार आहेत. त्यांचा काहीतरी अभ्यास असतो. यामुळे त्यांनी काही आकडा सांगितला राहणार आहे. मला आकडा सांगता येणार नाही. पण लोकांना मी भेटलो. तर लोकांना बदल हवा आहे. लोक मला सांगत होते. आम्हाला बदल करायचा आहे, उद्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एकत्र ठेवणे, एकत्रित निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काळजी घेणार आहे. लोकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे, असंही पवारांनी सांगितलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का ? असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. यावर ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याची चर्चा माझ्याशी झाली नाही. या चर्चेत मी नाही. माझे सहकारी आहेत. ते निर्णय घेणार, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाणार आहे. एकत्र लढण्यावर भर देऊ. लोकांना बदल व्हावा असं लोकांना वाटतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.