रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढणार; सुषमा अंधारेंनी काढल नवं प्रकरण

खरात प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.

Chakankar Andhare

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर (Kharat) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांच्या तक्रारींकडं दुर्लक्ष करुन चाकणकर आपलाच हेतू साध्य करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

खरात प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकरणात अनेक महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचं नाव आलं आहे. महिला आयोगच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं आढळून आलं.

अशोक खरात प्रकरणात चाकणकरांचं नाव घेत रुपाली ठोंबरेंनी केली मोठी मागणी

आता शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी काही धक्कादायक आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर यांनी महिलांची मदत करण्याऐवजी आपला स्वार्थ जपला अशा थेट आरोप अंधारे यांनी केला आहे. दरम्यान, अंधारे यांनी अनू मलिक यांच्या विरोधात अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी रुपाली चाकणकर यांच्याकडं केली होती. तरी देखील चाकणकरांनी कोणतीही कारवाई न करता त्या महिलांना न्याय मिळवून दिला नाही, असा गौप्यस्फोट केला आहे.

रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याच्या ‘विरजण’ या सिनेमाच म्युझिक लाँच अनू मलिक यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी त्या कार्यक्रमाला रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. अनु मलिक यांच्यावर 3 महिलांनी Me Too च्या प्रकरणात तक्रार केली होती. ही तक्रार रुपाली चाकणकर यांच्याकडं महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून केली होती. पण रुपाली चाकणकरांनी अनु मलिक यांना क्लिन चिट दिली. याबदल्यात अनु मलिक यांनी रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकरच्या सिनेमाचं म्युझिक लाँच केलं होतं, या आरोपानंतर यांचं काय कनेक्शन आहे अशी आता चर्चा सुरू झाली आहे.

follow us