‘सांगली’ पुन्हा काँग्रेसकडे! विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांनी निवडणुकीपूर्वीच जिंकली अर्धी लढाई

‘सांगली’ पुन्हा काँग्रेसकडे! विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांनी निवडणुकीपूर्वीच जिंकली अर्धी लढाई

सांगली : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली आहे. परंगपरागत काँग्रेसकडे (Congress) असलेला सांगली (Sangli) मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र या दोघांनीही दिल्लीपर्यंत धडका मारुन हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या जीवात जीव आला आहे. आता तेच इथून काँग्रेसचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. (It is clear that Sangli Lok Sabha constituency will not go to Shiv Sena but will remain with Congress.)

सांगलीसोबत कोल्हापूर आणि भिवंडी हे दोन मतदारसंघही काँग्रेसला सोडण्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती आहे. सांगलीच्या बदल्यात काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जालना मतदारसंघ आणि संजय लाखे पाटील यांच्या रुपाने उमेदवारही देऊ केला आहे. त्यामुळे जालन्यात आता भाजपच्या रावसाहेब दानवे विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय लाखे पाटील यांच्यात लढत होणार आहे.

‘शिवसेना अन् राष्ट्रवादी आम्ही फोडले नाही तर’.. अमित शाहांनी शेवटी खरं ‘पॉलिटिक्स’ सांगितलंच

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. या दरम्यान, गुरुवारी (14 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये त्यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली होती. यावेळी राऊत यांच्या माध्यमातून गांधी यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत कोल्हापूर, सांगली व भिवंडी या जागा काँग्रेससाठी सोडण्यास शिवसेना तयार झाली. तर जालना ठाकरेंना मिळाला आहे,

Russia : रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोण? तीन दिवस चालणार मतदान; पुतिन यांचं पारडं जड

असे असणार नवीन चित्र :

आता नवीन समीकरणानुसार कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती हे उमेदवार असणार आहेत. तर सांगलीत विशाल पाटील आणि भिवंडीमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे नीलेश सांबरे हे उमेदवार असणार आहेत. तर जालन्यात काँग्रेसमधून आयात केलेले संजय लाखे पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार असणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube