Baramati Loksabha : नणंद-भावजयीमध्ये कडवी झुंज; सुप्रिया सुळेंची 19 हजार मतांची आघाडी…

Baramati Loksabha : नणंद-भावजयीमध्ये कडवी झुंज; सुप्रिया सुळेंची 19 हजार मतांची आघाडी…

Baramati Loksabha : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) मतमोजणीच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुतीच्या उमदेवार सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना पिछाडीवर टाकलंय. मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर 19 हजार 947 मतांनी आघाडीवर आहेत. तर पहिल्या फेरीतही सुप्रिया सुळे 11 हजार 532 मतांनी आघाडीवर होत्या. खडकवासला वगळता सर्वच मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे. तिसऱ्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेरीस सुप्रिया सुळे यांना 33,748 मत मिळाले असून सुनेत्रा पवार यांना 31,184 मत मिळाले आहेत. सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात 2, 564 मतांची आघाडी आहे.

Lok Sabha Election : मतमोजणीआधीच भाजपने सूरत जिंकलं; देशातील पहिला निकाल भाजपाच्या खात्यात

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळाला होता. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघात रिंगणात उतरल्या होत्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरु होती. अखेर महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आल्यानंतर या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळाला आहे.

कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने विचारांना नवी उंची; निकालाच्या एक दिवस आधी PM मोदींची पोस्ट

बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान, पवार कुटुंबामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. एकीकडे अजित पवार यांनी मतदारसंघात सुनेत्रा पवारांसाठी झंझावात प्रचार केला. बारामतीतील दौंड, इंदापुर, तालुक्यांमध्ये अजितदादांनी जाहीर सभांचा धडाकाच मारल्याचं दिसून आलं होतं. तर शरद पवार गटाकडूनही जाहीर सभा घेत प्रत्युत्तर दिलं जात होतं. या जाहीर सभांच्या माध्यमातून अजितदादांनी ‘भावनिक’ मुद्द्यावरुन शरद पवार गटाला चांगलच धुतल्याचं दिसून आलं. तर शरद पवार गटानेही सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.

बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे पहिल्या फेरीनंतर 11 हजार 532 मतांनी आघाडीवर होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु होते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून दमदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे केवळ राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचं या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज