जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही
मंचर : आदिवासी भागातील जनतेच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे, अशी ग्वाही महायुती-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. ते आंबेगाव तालुक्यातील विविध गावभेटी दौऱ्यावेळी बोलत होते.
आदिवासी बांधवांच्या पाण्याच्या प्रश्नावर काम करणार; वळसे-पाटलांचा गावभेटीवेळी शब्द
वळसे पाटलांनी मायेचा आधार दिला
कोंढवळ, म्हातारबाची वाडी, राजपूर, तळेघर, फलोदे, जांभोरी, चिखली, पोखरी, राजेवाडी (ता. आंबेगाव) या आदिवासी गावांचा प्रचारदौरा केला. त्यावेळी ग्रामस्थांनी व लाडक्या बहिणींनी ठिकठिकाणी वळसे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माळीण दुर्घटनेतील कुटुंबाना सर्व प्रकारची मदत करून वळसे पाटील यांनी मायेचा आधार देण्याचे काम केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही
आदिवासी जनतेची वळसे पाटलांना साथ
वळसे पाटील यांनी या भागातील आदिवासी युवक-युवतींच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसेच महिला बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. या सर्व गोष्टींमुळे आदिवासी भागातील जनता वळसे पाटलांना विजयासाठी भक्कम साथ देईल अशी ग्वाही नागरिकांनी दिली. विरोधकांकडे टीका व दिशाभूल करण्याशिवाय कार्यक्रम नसल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले.
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
सरकारमध्ये असल्यानेच मोठी मदत शक्य
जून 2020 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आंबेगाव- जुन्नर तालुक्यात 65 गावांतील सात हजार 66 क्विंटल हिरडा पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने विशेष बाब म्हणून 15 कोटी 48 लाखांची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली यामुळे पाच हजार शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. सरकारमध्ये सहभागी असल्यानेच हे करणे शक्य झाल्याचेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.