“जुन्या गोष्टी कशाला उकरता?” पत्रकारांच्या प्रश्नांवर अजितदादा पुन्हा भडकले
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा (Sharad Pawar) भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. यावर बरंच राजकारण झालं. निवडणुकीत भाजपला याचा फटकाही बसला. अजितदादांनीही वक्तव्य खटकलं होतं. मोदींची भेट झाल्यावर त्यांना नक्की विचारेन असे अजित पवार म्हणाले (Ajit Pawar) होते. त्यानंतर रविवारी पंतप्रधान मोदी जळगावात आले होते. येथील कार्यक्रमात अजित पवारही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांची भेट झाली. हाच धागा पकडून माध्यमांनी विचारल्यानंतर अजितदादा भडकलेच. कशाला जुन्या गोष्टी उकरता? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी
पु्ण्यात विविध विभागांच्या बैठका घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी त्यांना हा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अजित पवार चिडल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या आधी हे मी बोललो होतो. आता निवडणुका झाल्या आहे. बरेच पाणी वाहून गेले आहे. निवडणुकांचे निकालही लागले आहेत. त्यामुळे आता नवे काय ते विचारा जुन्या गोष्टी कशाला उकरता? तुम्ही त्याच त्याच गोष्टी विचारणार असाल तर मी उत्तर देणार नाही असे अजित पवार म्हणाले.
येरवडा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाच्या नेत्यांची नावे नव्हती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या मुद्द्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. विकासकामांचे भूमिपूजन हा सरकारी कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका. यातून जर कुणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी या गोष्टीची नोंद नक्की घ्यावी असे अजित पवार म्हणाले.
Video : हे मला काढायला ठेवलं का?, नव्या इमारतीच्या पायरीवर पाय ठेवताच अजितदादा भडकले