‘मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजानं त्यांना बळीचा बकरा बनवलं’, राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut in Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामती मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथेही चुरशीच्या लढती आहेत. या पार्श्वभुमीवर आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) अजित पवार आणि (Ajit Pawar) नारायण राणे यांच्यावर (Narayan Rane) सडकून टीका केली.
राऊत म्हणाले, सगळे महत्त्वाचे मतदारसंघ आणि महत्त्वाचे नेते लढत आहेत. मोदी, शहा सगळे इथे भाषण करून गेले आहेत. या सर्व मतदारसंघात बारामतीत सर्वांचं लक्ष होतं. महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते आहे की काय ? शरद पवारांचा काहीही करून पराभव करायचा हे मोदी-शहा यांनी ठरवलं आहे. महाराष्ट्रात एका स्वाभिमानी नेत्याचा महाराष्ट्राचं आधारवड शरद पवार यांचा बारामतीत पराभव करून दाखवून द्यायचं आहे. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे.
Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड
गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशांच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करून त्यांना दाखवून द्यायचा आहे. विक्रमी मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील असा विश्वास आम्हाला वाटतो. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांच्या पतीराजाने त्यांना म्हणजेच एका गृहिणीला बळीचा बकरा बनवले. भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे. महाराष्ट्राचे अनेक विद्यमान खासदार यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. नारायण राणे यांचा आम्ही आधीच पराभव केला आहे. 10 वर्ष टोप्या लावल्या तेवढं पुरे झालं असा टोलाही राऊतांनी लगावला.
मुख्यमंत्री डरपोक माणूस
मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे. आपल्या स्वार्थासाठी जो माणूस आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतो त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा. हे डरपोक लोक आहेत एकनाथ शिंदे, अजित पवार असतील त्यांचे लोक एक नंबरचे डरपोक घाबरून पळालेले लोक आहेत. भ्रष्टाचाराचे खटले त्यांच्यावर ईडी,सीबीआय मागे आहेत अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांवर टीका केली.
Nashik Loksabha : मनधरणी निष्फळ! शांतगिरी महाराज निवडणूक लढवणारच; महायुतीचं गणित बिघडणार?