“आता चमत्कार कळाला असेल”; शरद पवारांचा काटेवाडीतून मोदींना खोचक टोला

“आता चमत्कार कळाला असेल”; शरद पवारांचा काटेवाडीतून मोदींना खोचक टोला

Sharad Pawar on PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. ज्या बारामतीच्या निवडणुकीची (Baramti Lok Sabha) चर्चा देशभरात होती त्या बारामतीत शरद पवारांचाच करिश्मा (Sharad Pawar) चालला आणि महायुतीचा पराभव झाला. आता या निवडणुकीनंतर शरद पवारांनी विधानसभेचंं मैदान तयार करण्यास सुरुवात (Maharashtra Assembly Elections) केली आहे. वयाचा विचार न करता जसा झंझावाती प्रचार लोकसभेच्या निवडणुकीत केला त्याच ताकदीने विधानसभेच्या आखाड्यात उतरायचं त्यांनी ठरवलंय. म्हणूनच राज्यात दौरा सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार आज पहिल्यांदा बारामती तालुक्यातील काटेवाडीत आले होते. येथील मेळाव्यात त्यांनी जोरदार फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोले लगावले.

“राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो” शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

शरद पवार म्हणाले, यावेळची निवडणूक सोपी नव्हती. त्यामुळे जास्त लक्ष घालावं लागलं. पण येथील लोकं माझ्या पाठीशी आहेत याची मला आधीपासूनच खात्री होती. आजपर्यंतच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये मला यश आलं. कारण, प्रचाराचा नारळ येथेच फोडला होता. कान्हेरी गावात नारळ फोडला की यश मिळतं असा आमच्या सगळ्यांचाच अनुभव आहे.

यंदा बारामतीच्या निवडणुकीची चर्चा विदेशातही होती. देशात कुठंही गेल्यावर लोक विचारायचे की बारामतीत काय झालं. जिथं मतं मिळणार नाहीत असं सांगितलं जात होतं त्या बूथवरही मतं मिळाली. मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का, असा सवाल करत आता त्यांनाही काटेवाडीकरांचा चमत्कार कळाला असेल असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.

“शरद पवार गटातील अनेक जण आमच्या संपर्कात” तटकरेंच्या दाव्याने खळबळ

काही ठिकाणी पैशांचं वाटप झाल्याचं सांगितलं जातं. पण हे खरं की खोटं हे मला माहिती नाही. आता जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत. काम करत राहायचं. आपल्या देशात लोकशाही आहे पण येथे हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न झाला. पण, तुम्हा लोकांमुळे लोकशाही टिकली. मला कुणीतरी सांगितलं की गावागावात त्यांचे फलक लागले आहेत. मी म्हटलं फलक त्यांचे पण यश आपलं आहे. निवडून कोण आलं यालाच जास्त महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं नाही असे शरद पवार यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज