“राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

“राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

Sharad Pawar in Baramati : लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. ज्या बारामतीच्या निवडणुकीची (Baramti Lok Sabha) चर्चा देशभरात होती त्या बारामतीत शरद पवारांचाच करिश्मा (Sharad Pawar) चालला आणि महायुतीचा पराभव झाला. आता या निवडणुकीनंतर शरद पवारांनी विधानसभेचंं मैदान तयार करण्यास सुरुवात (Maharashtra Assembly Elections) केली आहे. वयाचा विचार न करता जसा झंझावाती प्रचार लोकसभेच्या निवडणुकीत केला त्याच ताकदीने विधानसभेच्या आखाड्यात उतरायचं त्यांनी ठरवलंय. म्हणूनच राज्यात दौरा सुरू केला  आहे. राज्यातील दुष्काळाचा मुद्दा हाती घेत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं काम शरद पवार करत आहेत.

आजच्या दौऱ्यात शरद पवार बारामती तालुक्यातील निरा वागज गावात आले होते. येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. सुप्रिया सुळेंना तु्म्ही निवडून (Supriya Sule) दिलंत. त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिलं. तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. आता विधानसभेचाही विचार करावा लागेल.

Ashok Saraf: ‘शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम’ अशोक मामांनी सांगितला तो किस्सा

राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं केलं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो. लोकसभा निवडणुकीत जे योग्य होतं ते केलं. आता विधानसभेलाही योग्य तेच करावं, असा संदेश त्यांनी बारामतीकरांना दिला.

दरम्यान, राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सुरुवातीच्या टप्प्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची राज्यातील ही परिस्थिती आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवारांनी हा दौरा सुरू केला असून या माध्यमातून विधानसभा निवडणुकांची चाचपणीही सुरू केली आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’ शरद पवारांचा घुमजाव..

ज्यांना मोठं केलं ते सगळेच गायब

शरद पवार पुढे म्हणाले, सत्ता येते आणि जाते. लोकांच्या जीवनात बदल करण्याच्या उद्देशाने सत्तेचा वापर झाला पाहिजे असं काम केलं तरच लोकं तुमची आठवण ठेवतात असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. आाताच्या निवडणुकीतील चित्र वेगळं होतं. गावातले नेते कुठे होते कुणास ठाऊक. ज्यांना मोठं केलं ते तर कुठे आसपासही दिसत नव्हते. ज्यावेळी मतमोजणी झाली तेव्हा लक्षात आलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. निवडणुकीत तुम्हाला ठाऊक होतं की काय करायचं आहे आता पुढील जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube