अजितदादांना धक्का देणार, तुतारी हाती घेणार?; कळीच्या सवालांवर चिंचवडच्या ‘नानां’ची गुगली
Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Session) पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेतील यशानंतर महाविकास (Elections 2024) आघाडीत उत्साह संचारला आहे. त्यामुळे या आघाडीने अधिक जोमाने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कोण किती जागांवर लढणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत अजून काहीच निश्चित नाही. पण, आगामी निवडणूक आघाडी एकत्रित लढणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे.
राज्यातील परिस्थिती पाहता महाविकास आघाडीत इनकमिंगही (MVA) वाढली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. अशी परिस्थिती असताना पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) अजितदादांचे खंदे समर्थक नाना काटे कोणती (Nana Kate) भूमिका घेणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. या सर्व चर्चा आणि आगामी निवडणुकीत काय रणनीती असणार याचा खुलासा काटे यांनी केला आहे.
दादा पालकमंत्री होताच भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले; नाना काटेंचा रोख कोणावर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची चांगली ताकद आहे. जागा वाटपात ही जागा भाजपला गेली तरीही मी निवडणूक लढणार आहे.
शरद पवार गटात (Sharad Pawar) जाणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सावध उत्तर दिलं. मी मागील वेळी अजितदादांना भेटलो होतो. त्यावेळी अजितदादांनी मला संकेत दिले होते की तू तुझं काम सुरू ठेव पुढं काय करायचं ते आपण पाहू. जागावाटपात जर ही जागाच तुम्हाला सुटणार नाही तर कोणत्या चिन्हावर लढणार या प्रश्नावर काटे म्हणाले, हा निर्णय त्यावेळी घेतला जाईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मी नक्कीच निवडणूक लढणार आहे. चिन्ह काय असेल याचा निर्णय परस्थिती पाहून घेईल.
चिंचवड राष्ट्रवादीलाही मिळू शकतो
शरद पवार यांनी जर चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली तर तुम्ही स्वीकारणार का? या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सावध उत्तर दिलं. याबाबत मी अजून काहीच निर्णय घेतलेला नाही. तसेच हा मतदारसंघ भाजपालाच जाईल याचीही काही शाश्वती नाही. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. ती संख्या पाता जगताप यांच्यातही दोन उमेदवार झाले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांच्या वादात कदाचित हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटू शकतो. त्यामुळे आता लगेच याबाबतीत कोणतेही विधान करणे योग्य होणार नाही. मी शंभर टक्के चिन्हावरच निवडणूक लढणार आहे चिन्ह कोणतं असेल याचं उत्तर त्यावेळी देऊ, असे उत्तर नाना काटे यांनी दिले.
शरद पवारांकडून नाना काटेंसह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना सूचना, म्हणाले..