पुरंदर विमानतळ कधी होणार? दिल्लीहून परतताच मंत्री मोहोळांनी सांगितली डेडलाईन
Muralidhar Mohol tell about deadline of Purandar Airport : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन झाले असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) 9 जून ला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेतली. त्यामध्ये मंत्रिपद मिळालेल्या खासदारांमध्ये राज्यातील पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना (Muralidhar Mohol ) नागरी उड्डाण खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मोहोळ नुकतेच पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी पुरंदर विमानतळ ( Purandar Airport ) कधी होणार? याबद्दल माहिती दिली आहे.
सर्वांनी मिळून शेवटी माझा विश्वासघात…; राजू शेट्टींची मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, पुरंदर विमानतळाला डीजीसीए ची मान्यता मिळाली आहे तसेच या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील या टर्मिनल च्या कामासाठी सीआयएसएफची सिक्युरिटी गरजेची त्याबाबत अमित शाह यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे. पुरंदरच विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. कारण डीजीसीएने पुरंदर एयरपोर्टला मान्यता दिली आहे. अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
पहिल्याच अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार; लोकसभेचे उपाध्यक्षपद पदरात पाडून घेणार ?
तसेच त्यांनी यावेळी दिल्लीमध्ये शपथविधीच्या दरम्यान झालेल्या बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीतील काही किस्से सांगितले. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की शपथविधीनंतर मला दीड दिवसाची सुट्टी मिळाली आहे. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलो असलो तरी मला नऊ वाजेपर्यंत माहिती नव्हतं की, मला मंत्रिपद मिळेल मात्र मी महाराष्ट्र सदनमध्ये आराम करत असताना मला अचानक फोन आला. त्यामुळे आता मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी पार पाडेल.