Nitish Kumar met Mamata Banerjee : मोदी विरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी (Opposition Unity) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या ते भेटी घेत आहेत. आज मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर […]
Sudden increase in suicides of daily wage workers : देशात रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एक लाखाहून अधिक रोजंदारी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने ही आकडेवारी संसदेसमोर मांडली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) अहवालाचा हवाला देत कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, 2019 […]
शार्क टँक मधील शार्क आणि Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी गुगलच्या बिलिंग सिस्टिमला ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी गुगलला ‘डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी’ म्हटले आहे. उद्योगपती असलेल्या मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की Google भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून काम करत आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) अधिकारी याकडे लक्ष देतील. अनुपम मित्तल यांनी […]
Same-sex marriage case : बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने आपल्या ठरावात म्हटले आहे की, ‘समलैंगिक विवाहाच्या (Same-sex marriage) मुद्द्याची संवेदनशीलता लक्षात घेता आणि विविध सामाजिक-धार्मिक पार्श्वभूमीतील लोकांचे हीत लक्षात घेऊन संयुक्त बैठकीचे सर्वानुमते मत आहे. विविध सामाजिक, धार्मिक गटांचा […]
Bhagwant Mann told the thrill of Amritpal’s arrest : गेल्या महिन्याभरापासून खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून शोध सुरू होता. मात्र, अमृतपालला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हतं. आधी पटिलाया, नंतर हरियाणा, अशी सतत आपली ठिकाणं बदलून अमृतपाल पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, अमृतपाल सिंग याला आज सकाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या […]
Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मोदींच्या दौऱ्याआधी आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकीची चिठ्ठी केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांकडे धाडण्यात आली. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास करत धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोच्ची सिटी पोलीस आयुक्त के. सेतू रमन यांनी रविवारी […]