पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने (BJP) थेट आता 2024 च्या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांच्यानंतर पुणे लोकसभेचा (Pune Loksabha) भाजपकडून चेहरा नेमका कोण असणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश […]
जुन्नर : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) हे राखीमॅन (Rakhiman) बनल्याचे पाहायला मिळालं आहे. रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्ताने आज (ता.30 ऑगस्ट) आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना जुन्नर तालुक्यातील सुमारे 8 हजार महिला भगिनींनी राखी बांधली आहे. यावेळी आमदार बेनके यांनी हा भाऊ प्रत्येक सुख दु:खात तुमच्या पाठीशी उभा राहिल, […]
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेचा(Sambhaji Bhide) मोठा रोल असल्याचा जबाब वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर दिला आहे. 1 जानेवारी रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात मोठा हिंसाचार घडला होता. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने प्रकाश आंबेडकरांना(Prakash Ambedkar) आज जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. आयोगासमोर तब्बल अडीच […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अत्यंत विचारपूर्वक मला उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे, असा खुलासा करत चंद्रकांत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून साईडलाईन केले असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते ‘सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन’च्या ‘ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात […]
पिंपरी : रक्षाबंधनच्या दिवशी पिंपरी-चिंचवड येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिखली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. Asia Cup 2023: बांगलादेश-अफगाणिस्तान बिघडू शकतात अनेक संघांचा गेम प्लॅन, असा आहे विक्रम मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखली परिसरात असलेल्या सचिन हार्डवेअर या दुकानाला पहाटेच्या […]
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या वेगाने हालचाली सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज पक्षानेही दंड थोपटलं असून आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांनी(Mahadev Jankar) केली आहे. पुण्यात काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. […]