ब्रेकिंग : पवारांच्या एकनिष्ठ शिलेदाराची ‘पंजा’शी हातमिळवणी; जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
Prashan Jagtap काँग्रेसमध्ये प्रवेशापूर्वी जगतापांना ठाकरेंनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. जगताप आणि ठाकरेंमध्ये तब्बल 9 मिनिटे चर्चा झाली.
Prashan Jagtap Join Congress : आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला थेट विरोध करत शरद पवारांचे एकनिष्ठ शिलेदार प्रशांत जगताप (Prashan Jagtap) यांनी आज (दि.26) मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जगतापांनी पवारांची साथ सोडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेशापूर्वी जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी फोनवर पक्षात येण्याची ऑफर दिली होती. जगताप आणि ठाकरेंमध्ये तब्बल 9 मिनिटे चर्चा झाली. एवढेच नव्हे तर, एकनाथ शिंदेंनीदेखील जगताप यांना फोन केला होता. पण, दोन्ही नेत्यांचे बोलणे होऊ शकले नाही. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंची थेट ऑफर नाकारत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हिमालया सारखा काँग्रेस पक्ष आजही उभाय म्हणून…
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जगताप म्हणाले की, राजकारण सोडेल पण काँग्रेस सोडणार नाही कारण, हिमालया सारखा काँग्रेस पक्ष आजही उभा आहे म्हणून मी यात पक्ष प्रवेश करतोय. भाजप जातीवाद निर्माण करतंय त्यांच्या विरोधात माझी लढाई असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले. देशात गुन्हेगरित पुणे शहराचा क्रमांक तसेच भ्रष्टाचारातदेखील पुण्याचा पहिला क्रमांक आणि हे शहर भाजपच्या ताब्यात आहे. देशात भाजपाला फक्त काँग्रेस टक्कर देऊ शकतो असा दावाही जगताप यांनी यावेळी बोलताना केला. Prashan Jagtap Join Congress
पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा…
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी "काँग्रेस" पक्षात कार्यरत होत आहे.…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 26, 2025
पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा…
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे. भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक – जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे देशाचे नेते आदरणीय राहूल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे. मला ही संधी देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे, पुणे शहरातील सर्व नेत्यांचे व मला भक्कम पाठबळ देणाऱ्या माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !
राज्यात 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी; मागील निवडणुकीत कोणाची कुठे आणि किती होती ताकद?
दादा, सुळे अन् पवारांमुळे घडलो
काँग्रेसपक्षात जाहीर प्रवेश करण्यापूर्वी जगताप यांनी एक्सवर एक पोस्ट करत आपण अजितदादा, सुप्रिया सुळे आणि शरद पवा याच नेत्यांमुळे मी कार्यकर्ता म्हणून घडल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध माध्यमांकडून माझ्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. यापैकी कोणत्याही प्रतिक्रियेत मी माझे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. याच नेत्यांमुळे मी कार्यकर्ता म्हणून घडलो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कालही आदर होता, आजही आहे आणि यापुढेही अनंत काळ आदरच असणार असल्याचे नमुद केले होते.
दोन दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध माध्यमांकडून माझ्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत, यापैकी कोणत्याही प्रतिक्रियेत मी माझे श्रद्धास्थान आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय खा.सौ.…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 26, 2025
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचे फोन तरी काँग्रेसची वाट धरणारे प्रशांत जगताप कोण?
1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात
पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम
2016-17 या कालावधीत पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली
2021 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती
2023 मध्ये दोन्ही राष्ट्रवादीती फुटीनंतर शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (श.प) हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली
अजित पवार तयार असतील तर त्यांना अटीशिवाय मविआत घेऊ; अंकुश काकडेंनी स्पष्टच सांगितलं
पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पुण्यात ओळख
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळख
सलग तीन वेळा वानवडी परिसरातून नगरसेवक राहिले
2007,2012 आणि 2017 या तिन्ही महापालिका निवडणुकीत जगताप निवडून आले
प्रशांत जगताप अखेर काँग्रेसवासी:हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा; पक्षाची पुण्यातील ताकद वाढली #PrashantJagtap #Congress #Pune @JagtapSpeaks @INCHarshsapkal @PawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @INCMaharashtra pic.twitter.com/aDUmNj8k6z
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 26, 2025
