कॅबचालकाने प्रामणिकपणा दाखविला; पण पोलिस अधिकाऱ्याची नियत फिरली !

  • Written By: Published:
कॅबचालकाने प्रामणिकपणा दाखविला; पण पोलिस अधिकाऱ्याची नियत फिरली !

Police Officer Involved in MD drugs Racket : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्सचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणले आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे एमडी (MD drugs) ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे, दिल्लीसह इतर भागातून धडपकड करण्यात आली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आता एका प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील उपनिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शेळके याला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडे 45 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पण तपासात या अधिकाऱ्याकडे हे ड्रग्ज आले कसे ? याचाही उलगडा झाला आहे. थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजही उपलब्ध झाले आहे.

धर्मशाला कसोटीपूर्वीच भारत नंबर वन होणार? ऑस्ट्रेलियाच्या विजयावर गणित ठरणार

शुक्रवारी पहाटेच्या वेळी पिंपळे निलख येथे सांगवी पोलिस ठाण्याचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक कारवाई केली. नमामी शंकर झा (वय 32 ) याला पोलिसांनी अटक केली. तो मूळचा बिहारमधील असून, तो सध्या निगडी भागात राहतो. त्याच्याकडेही 2 कोटी रुपयांचे दोन किलो एमडी जप्त करण्यात आले.

Lok Sabha Election : भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला का वगळले?

झा याच्याकडे पोलीस चौकशी करत होते. त्यात झा याने धक्कादायक माहिती दिली. सांगवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक विकास शेळके याचा थेट सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. उपनिरीक्षक विकास शेळके आणि साथीदाराकडून जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज देहूरोड-निगडी रस्त्यावर पोत्यात पडले होते. कॅब चालकाने ते उचलून पोलिसांना नाकाबंदी दरम्यान आणून दिले. मात्र, याचा तपास करण्यापेक्षा हे एमडी विकण्याचा डाव शेळके याने आखला होता. त्यामुळे त्याने हे ड्रग्ज पोलिस स्टेशनला जप्त दाखविले नाही. त्यामुळे गुन्हाही दाखल झाला नव्हता.

त्याने झा या साथीदाराच्या मदतीने ड्रग्जची विक्री करायची होती. त्यासाठी झा कडे काही ड्रग्जचे पाकिटे दिली होती. परंतु झा पोलिसांच्या तावडीत सापडला आणि तेथेच शेळकेचा भंडाफोड झाला. त्यानंतर शेळके याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याच्याकडून 45 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ज्या पोलिस स्टेशनला अधिकारी म्हणून मिरविणारी शेळके आता त्याच पोलिस स्टेशनचा आरोप झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube