खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. - अजित पवार
Pune Collector यांनी पत्रकार परिषद घेत पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने झालेल्या परिस्थितीचा आढावा मांडला. नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.