Pune Accident : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात…
Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघाताच्या (Pune Accident) घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत. या अपघात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि आमदार रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) राज्य उत्पादन शुल्क (Excise Department) कार्यालयात जात अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरलंय. पोलिसांकडून ७० ते ८० लाख रुपयांचा हप्ता घेतला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. तर विभागाकडून आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं दिसून येत असल्यांचही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पब, बारमध्ये अल्पवयीन मुलांना दारु विक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आलीयं.
चला, अनअधिकृत पब, बार दाखवतो; धंगेकर, जोशी अन् अंधारे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना भिडले
अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच पबमालकावरही गुन्ह्यांची नोंद झालीयं. आता अल्पवयीन मुलांना दारु विक्री केल्याप्रकरणी दारुबंदी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही वर्षांत पुण्यात अनेक परमिट रुम्सला लायसन्स देण्यात आलंय. दारु विक्रीसाठीचं लायसन्स राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात येतं.
Box Office:’श्रीकांत’ आणि ‘भैय्या जी’मध्ये जोरदार स्पर्धा, ‘या’ सिनेमाची 37 कोटींहून अधिक कमाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एका पथकाची नेमणूक केली जाते. प्रत्येक बार, पबमध्ये जाऊन नियमित तपासणी करणे, बेकायदेशीर बाबी आढळल्यास त्यावर कारवाई करणे, या गोष्टींवर पथकाकडून करडी नजर ठेवली जाते. मात्र, मागील काही महिन्यांत या गोष्टींचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला विसर पडल्याचं दिसून आलंय. दोन वर्षात पुण्यात अनेक परमीट रुम्सना लायसन्स देण्यात आले. अनेक परमिट रूम्सचे सेटअप वाईनशॉपप्रमाणे आहेत. परवानगी नसताना देखील किरकोळमध्ये दारूची विक्री परमिट रूम्सकडून केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
अवैध दारु विक्रीत मंत्र्याच्या मुलाची भागीदारी :
पुण्यात मध्यरात्रीपर्यंत अवैध दारु विक्री केली जात असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. अपघाताच्या घटनास्थळी Tonique नामक दारुचा मॉल आहे. या मॉलमध्ये विविध प्रकारची दारु असते. या मॉलमध्ये एका मंत्र्याच्या मुलाची भागीदारी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच या मॉलमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत दारुविक्री सुरु असते.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याचे Tonique मॉलमधील पब्स आणि रेस्टॉरंटमध्ये स्टेक असल्याचं समोर आलं आहे. तर आणखी एक अधिकारी ललित पाटील प्रकरणात फेमस झालेल्या हॉटेलमध्येच राहत असल्याची माहिती गोपनीय सुत्रांकडून समोर आलीयं. या रुमचा दर दिवस 7 हजार रुपये इतका आहे.
2 वर्षांत 8 हजार गुन्हे दाखल…
आमच्यावर केले जात असलेले आरोप पर्णतः चुकीचे आरोप असून पुणे एक्साईज विभागाचा प्रमुख म्हणून यामध्ये काही होत असेल, तर याबाबत चौकशी आम्ही करू आणि या प्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार स्विकारल्यापासून दोन वर्षांत जवळपास 8 हजार गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीयं.