चला, अनधिकृत पब, बार दाखवतो; धंगेकर, जोशी अन् अंधारे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना भिडले

चला, अनधिकृत पब, बार दाखवतो; धंगेकर, जोशी अन् अंधारे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना भिडले

MLA Dhangekar, Andhare Protest Excise Department :  पुणे अपघात प्रकरण तापलेलच. पुण्यात आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर यांनी आंदोलन केलं आहे. परवान्याची एनओसी नसताना पब, बार सुरू आहेत असा थेट आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यावर पोलीस अधिकारी म्हणाले तपास करून कायदेशीर कारवाई करू. मात्र, हे तिघही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याने पोलीस अधिकारी निशब्द झाले. तसंच, तुम्हाला आम्ही 48 तास देतोय. कारवाई नाही झाली. तर आम्ही बुलडोजर घेऊन येऊ असंही हे नेते म्हणाले आहेत. दरम्यान, 48 तासांत आम्ही कारवाई करू असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

 

तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का?

तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत असं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणताच. आमदार रविंद्र धंगेकर चांगलेच तापले. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे आहे असा थेट खुलासाच त्यांनी केला. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का? तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही अशा शब्दांत धंगेकरांनी पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला.

 

आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती

रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणार्‍या पोलिसांची यादीच वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराच धंगेकर यांनी यावेळी पोलिसांना दिला.

 

सुषमा धंगेकरांनी पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची यादीच वाचून दाखवली

 

द माफिया- 1 लाख रुपये
एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी 50 हजार रुपये
टू बीएचके- 1 लाख
बॉलर- २ लाख
राजबहादूर मिल्स बिमोरा- १ लाख
मिल्ट- १ लाख
टीटीएम रुफटॉप- ५ हजार
स्काय स्टोरी -५० हजार
जिमी दा ढाबा- ५० हजार
टोनी दा ढाबा- 50 हजार
आयरिश- ४० हजार
टल्ली टुल्स- ५० हजार
अॅटमोस्पिअर- 60 हजार
रुड लॉर्ड – ६० हजार
24 के- दीड लाख
कोको रिको हॉटेल- 71 हजार रुपये

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज