Pune Accident : आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; डॉक्टरांना पोलिस कोठडी, न्यायालयात काय घडलं?

Pune Accident : आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; डॉक्टरांना पोलिस कोठडी, न्यायालयात काय घडलं?

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Accident) अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलल्याचा आरोप करत पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केलीयं. डॉ. अजय तावरे (Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हरलोर (Shreehari Harlor) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं. आता येत्या 30 मेपर्यंत पोलिस या प्रकरणात अधिक तपास करणार आहेत.

Video : विधानसभेतही खटपट होणारच; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांनी दिलं उत्तर

ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ . अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना पोलिसांनी अटक केलीयं. अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टसंदर्भात फेरबदल करण्यासाठी मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांना फोन केला असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आलायं.

पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत असताना तरुणी-तरुणाला कारने चिरडले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ससून रुग्णालयात मेडिकल करण्यात आलं. यावेळी त्याने मद्य प्राशन केले की नाही? याचीही तपासणी करण्यात आली होती. मात्र, डॉक्टरांनी त्याचे ब्लड सॅंपल कचऱ्याच्या डब्यात टाकून तो दारु पिलेला नसल्याचा अहवाल दिला असल्याचा आरोप करण्यात आलायं.

भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा

मात्र, अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलगा दोन ठिकाणच्या बारमध्ये मद्य पित असल्याचं समोर आलं. अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये त्याने मद्य प्राशन केलं नसल्याचं समोर आल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांना अटक करुन आज न्यायालयात हजर केलं.

आरोपी डॉक्टरांच्या वकिलांनी काय म्हटलं?
आमच्या अशिलांवर पोलिसांकडून कलम 214,213, 201 कलम 464 नूसार गुन्हा नोंदवण्यात आलायं. त्यांच्या ज्या प्रकारे आरोप ठेवण्यात आला आहे, त्यामध्ये ही कलमे लावली जात नाही. आम्ही न्यायालयात युक्तिवाद केलायं. पोलिसांकडून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तपासणी करण्याची परवानगी व रुग्णालयातील नोंदीची मागणी केली. पण या प्रकरणात आरोपीची कोठडी मागता येत नाही तरीही पोलिसांनी कलम 464 मुळे कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने कोठडी दिलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube