Pune : काँग्रेस पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पुण्यात खळबळ

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 24T105651.839

पुणे : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे (Vikas Tigare) (वय ४९, रा. पोरवाल रस्ता, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून या आत्महत्येमागचं नेमके कारण मात्र, अद्याप समजू शकलेले नाही. (Vikas Tigre Suicide News)

Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टिंगरे हे पुण्यातील विश्रांतवाडी परिसराचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष कार्यरत होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात टिंगरे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता.23 मे) दुपारी पतसंस्थेत आले होते. त्यांनी दुपारी जेवण केले नव्हते. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये जाऊन पाहिल्यावर टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले केले.

Jayant Patil ED Enquiry : भाजपची ऑफर नाकारल्यानेच जयंत पाटलांना लक्ष्य; सामनातून जोरदार टीका

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टिंगरे यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्यापही समजू शकले नाही. याबाबतचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिसांकडून येत आहे.

Video : असा मिळवा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ!

Tags

follow us