3500 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड संदीप धुनिया; अटकेसाठी यंत्रणा कामाला

3500 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड संदीप धुनिया; अटकेसाठी यंत्रणा कामाला

Pune Drug Case : राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून 3500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त (Pune Drug Case) करण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. संदीप धुनिया (Sandeep Dhuniya) असं या मास्टरमाईंडचं नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांसह इतर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.

उंटावर चक्कर मारताना डाव उलटला; नेमकं काय घडलं? थरकाप उडविणारा व्हिडिओ व्हायरल

ड्रग्जचा मास्टरमाईंड संदीप धुनिया आखाती देशांतील कुवैतमध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. पोलिसांनी धुनियाच्या अटकेसाठी सीबीआयची मदत घेतली आहे. तसेच रेड कॉर्नर नोटीसही बजावण्याची तजवीज करण्यात आली आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणांमध्ये सरकारी पक्षांकडून विशेष वकीलांची नेमणूक करुन फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाणार आहे.

अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय

कोण आहे संदीप धुनिया?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संदीप धुनिया हा भारतीय आहे. धुनियाकडे ब्रिटीश पासपोर्ट असून त्याला याआधीही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. डीआरआयकडून 2016 साली ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी डीआरआयकडून 150 कोटींचं एमडी जप्त करण्यात आलं. या छाप्या आरोपी विपीन कुमारला अटक करण्यात आली होती. सध्या कुमार येरवडा तुरुंगात आहे. तर याचं प्रकरणात संदीप धुनिया जामिनावर बाहेर आहे. धुनियाकडूनच अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमधील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळ याला ‘एमडी’ बनवण्याचे काम दिले होते.

Sonam Kapoor च्या फॅशनचा जगात डंका! फॅशनमधील प्रतिष्ठितांच्या यादीत टॉप 40 मध्ये मिळवलं स्थान

डीआरआयकडून करण्यात आलेल्या कारवाईमद्ये सांगलीच्या आयुब मकानदारलाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणात संदीप धुनियासह, विपिन कुमार आणि मकानदार हे तिघेही येरवडा कारागृहात होते. याच कारागृहात आरोपी हैदर शेख आणि माने यांच्या संपर्कामुळे ड्रग्ज रॅकेटची नवीन टोळी उदयास आली होती.

दरम्यान, एमडी ठेवण्यासाठी जागा शोधण्यासाठी संदीप धुनिया 30 जानेवारीला नेपाळच्या काठमांडूत गेला होता. पुणे पोलिसांकडून दिल्लीत एमडी पकडण्यात आले होते. हेच एमडी काठमांडूमधून लंडनला पाठवण्यात येणार होतं. दरम्यान, धुनिया नेपाळमधूनच कुवैतला पळून गेला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube