पुणे जिल्ह्यासाठी तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर; विभागीय आयुक्त यांनी सर्कुलर केले जारी

पुणे जिल्ह्यासाठी तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर; विभागीय आयुक्त यांनी सर्कुलर केले जारी

Pune Local Holidays declared : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंदाच्या वर्षाकरिता तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या (Pune Local Holidays) जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्या पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू असतील.

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, काय आहे नक्की प्रकरण?

2025 मध्ये द्यावयाच्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्कुलर जारी केले आहे. या सर्कुलरनुसार पुणे जिल्हातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांना 2025 या वर्षासाठी 3 अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 01 सप्टेंबर 2025 सोमवार – गौरीपूजन, 22 सप्टेंबर 2025 सोमवार – घटस्थापना, 20 ऑक्टोबर 2025 सोमवार – नरक चतुर्दशी

या अतिरिक्त तीन स्थानिक (Pune Local Holidays) सुट्ट्या पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना (अत्यावश्यक सेवा वगळून) जाहीर करण्यात येत आहे. असे विभागीय आयुक्त कार्यालयाने आपल्या सर्कुलरमध्ये म्हटले आहे.

त्या’ निर्णयांचा अवमान करता योणार नाही; जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठ विधान

पुणे गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणीबाबत सन 2025 मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे यांच्या दि. 29 ऑगस्ट 2025 रोजीच्या पत्रानुसार या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेश (दि. 18 ऑगस्ट 2025) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतील दिनांक 1 सप्टेंबर 2025, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक 5 सप्टेंबर 2025, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे.

हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube