आरोग्यमंत्र्यांची घोषणा ! पुण्यातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती गठीत

आरोग्यमंत्र्यांची घोषणा ! पुण्यातील किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समिती गठीत

Ruby Hall Clinic Kidney Racket : पुणे शहरातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय व अशासकीय सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येईल. तीन महिन्यात अहवाल सादर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केली.

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणी विधानसभे प्रश्न उपस्थित केला होता. ही संघटीत गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण राज्यभरात पसरल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वाचा : ब्रेकिंग : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सुट राहणार कायम; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परिक्षकांच्यामार्फत परीक्षण करून अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचेही मंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

 कुस्ती रंगण्याआधीच वाद; पुणे की सांगली कुठे होणार महिला महाराष्ट्र केसरी ?

दरम्यान, किडनी तस्करी प्रकरणात हॉस्पिटलमधील काही डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे समिती चौकशी करून काय अहवाल देणार, या अहवालात काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube