Pune : पुण्यातीस कर सवलतीवरुन वाद पेटला; भाजप-आप आमनेसामने

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 17T180824.487

Pune Property Tax :  पुणेकरांना ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार असून, येणाऱ्या पहिला कॅबिनेट  बैठकीमध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत  घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत. पण आता या मद्द्यावरुन  भाजप व आम आदमी पक्ष यांच्यात वाद पेटला आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या ट्विटनंतर आम आदमी पक्षाचे नेते डॉ. अभिजीत मोरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा भाजपचा ढोंगीपणा आहे. 1970 पासून भारताला कर सवलत मिळत होती. ती 2019 मध्ये भाजप राज्यात व महापालिकेमध्ये सत्तेत असताना बंद करण्यात आली होती. सवलत रद्द करणारे तुम्ही, कर वाढवणारे तुम्ही व आता सूट देण्याचा ढोल पिटणारे देखील तुम्हीच, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सुट राहणार कायम; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

याआधी भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी मिळकत करात 40 टक्के सवलत मिळाल्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. मिळतकरात पुन्हा ४० टक्के सूट मिळणार, पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, यााबाबत बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेतील करसवलत पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्तावून जाण्याची आवश्यकता नाही. पुणे महापालिकेच्या बसची भाढेवाढ होण्याची शक्यता संपली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनधिकृत बांधकामाबाबत तिप्पट शास्ती शासनाने माफ केला होता. पुणे महापालिकेच्या नागरिकांनादेखील अशी सुट मिळणार असून, तिप्पट दंडाच्या नोटीसीबाबत पुढल्या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us