काँग्रेसच्या हाती सत्ता गेल्यास रस्त्यावर फिरणं कठीण होईल; राज ठाकरेंची जोरदार फटकेबाजी

काँग्रेसच्या हाती सत्ता गेल्यास रस्त्यावर फिरणं कठीण होईल; राज ठाकरेंची जोरदार फटकेबाजी

Raj Thackeray Criticize Congress on Hindu Muslim in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पुणे लाकसभा मतदारसंघाचे महायुती आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज ( 10 मे ) ला सभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर रस्त्यावर फिरणं कठीण होईल. असं म्हणत हिंदू-मुस्लिम ( Hindu-Muslim ) राजकारणावरून कॉंग्रेस आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

Armanai 4 च्या शूटमध्ये घडली खास गोष्ट! राशी खन्नाने व्यक्त केली कृतज्ञता

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शहर बरबाद झाली तरी चालतील. मात्र लोक जातीवरून कोणी काही बोललं की, लगेच पेटून उठतात. लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन राजकारणी त्यांची पोळी भाजून घेतात. असाच काहीसा प्रकार सध्या काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि मशीदींमध्ये फतवे काढले जात आहेत की, मुस्लिम समाजाने काँग्रेस उमेदवारांना तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करा.

Ankush Chaudhari अन् निर्माते अभिषेक बोहरा पहिल्यांदाच येणार एकत्र

मात्र अनेक मुस्लिम हे सुज्ञ आहेत. त्यांच्या वाट्याला जाणार नाहीत. कारण काँग्रेसकडून मुस्लिम समाजाला घरची गुरढोरं असल्याप्रमाणे ऐन निवडणुकांच्या तोंडावर असले फतवे काढले जातात. त्यामुळे जर मुस्लिम लोकांना अशा प्रकारे फतवे काढले जात असतील. तर मी देखील सर्व हिंदू बांधवांना महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा फतवा काढतो. कारण गेल्या दहा वर्षांमध्ये भाजप सरकार असल्याने काही विकृत मुस्लिमांना तोंडवर काढता आलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारे काँग्रेसला मतदान करण्याच्या फतवे काढले जातात.

त्यामुळे ते निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर रस्त्यावर फिरणं कठीण होईल. ज्याप्रमाणे 80 ते 90 च्या दशकामध्ये धार्मिक दंगलींमुळे उन्हात सुरू होता. ज्याचा शेवट बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube