घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले…
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.

Ravindra Dhangekar On Nilesh Ghaywal and BJP Media : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी लागेबांधे असल्याचं वक्तव्य शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी केलं. यावर एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय. समीर पाटीलवर मकोकासारखी कारवाई, कुणावर गुन्हे दाखल करायचे असतील तर समीर पाटील सांगतो. पुण्यातील गुन्हेगारीवर बोलणं माझं कर्तव्य आहे, तुम्ही माझ्यावर का घसरता ? असा धंगेकरांनी भाजपला सवाल केलाय.
मी निलेश घायवळचं काय करायचं, हा माझा साधा प्रश्न आहे. पण यावर कोणी भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही.
शिवसेनेत येवून चूक केली?
मी (Ravindra Dhangekar) आज काही कमी बोलतंय, असं तुम्हाला वाटतं का? मी पहिला पुणेकर आहे. काल मी जे बोलतो, तेच शिंदे साहेब बोलले. पुणे शहर (Pune Crime) भयमुक्त झालं आहे. याची जबाबदारी लोकप्रतिनिधी यांची ( Nilesh Ghaywal) आहे. याच्यात मी ज्या-ज्या वेळी आंदोलनं केली, त्या-त्या वेळी मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असो नसो, मी खुर्चीला हापालेलो नाही. आज माझ्या कुटुंबाचं नुकसान झालंय. माझ्या पोरा-बाळांचं नुकसान झालंय. माझे प्रोजेक्ट बंद केलेत, हे सगळं भाजपच्या (BJP) लोकांनी केलंय.
माझ्या मुलांवर, पत्नीवर हल्ला केला
मी कधी आयुष्यात चुकीचं काम केलं नाही. मी आजही हल्ला पचवतो. माझा खूप मोठा तोटा झालाय. पण मी घाबरत नाही. मला फक्त जनतेसाठी काम करायचं आहे. मरेपर्यंत भीती नाही. परंतु ज्या पद्धतीने माझ्या मुलांवर, पत्नीवर हल्ला केला, त्याचा जाब मी दादांना विचारणार आहे, असं देखील रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलंय.
भाजपची मीडिया
काल शिंदे साहेबांना भेटलो. मी चंद्रकांत पाटलांवर अजिबात बोलत नाही, मी केवळ प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर ते देत नाहीत. भाजप सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवते. युतीत खुरापती, धंगेकरांचा इंगा मोडला. हे कोण करतंय? भाजपची मिडिया. अरे मी स्वत:साठी भांडत नाही, असा निशाणा भर पत्रकार परिषदेत रविंद्र धंगेकर यांनी साधला. ही राजकीय संस्कृती नाही. ही संस्कृती पुण्यात कधीच नव्हती. मी तुमच्या पक्षाचा थोडीच मालक आहे, असं देखील रविंद्र धंगेकर यांनी म्हटलंय.
भाजपमधला गट मदत करतोय…
माझ्या मुलाच्या हातात खेळण्याची बंदूक होती. पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे ही, माझी भूमिका. माझ्या भूमिकेला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे. अजित पवार माझे नेते आहेत, पण त्यांचं कोण ऐकतं का? चंद्रकांत दादांना एकदा सगळं कुटुंब घेऊन जाऊन भेटणार. आमच्यावर अन्याय का केला? असं विचारणार. भाजप मधला स्वाभिमानी गट मला मदत करत आहे. त्यांना वाटतं की, मी त्यांची भाषा बोलतो म्हणून ते मदत करतात, असंही धंगेकर पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहेत.