Ravindra Dhangekar : “मी रवींद्र लक्ष्मीबाई…” आईचे नाव घेत घेतली शपथ, सभागृहात Who Is Dhangekar च्या घोषणा

  • Written By: Published:
Ravindra Dhangekar : “मी रवींद्र लक्ष्मीबाई…” आईचे नाव घेत घेतली शपथ, सभागृहात Who Is Dhangekar च्या घोषणा

कसबा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपचा गड मानला जाणारा कसबा मतदारसंघ जिंकून गेल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यभर झाली. आज त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी चिंचवड मतदार संघातून निवडून आलेल्या आश्विनी जगताप यांनी देखील विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली.

मी रवींद्र लक्ष्मीबाई…” आईचे नाव घेत घेतली शपथ

रवींद्र धंगेकर यांनी शपथ घेताना आज, “मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो” असं म्हणत त्यांनी विधानसभेची शपथ घेतली.

हेही वाचा : Live Blog | अवकाळीच्या परिस्थितीवर अजित पवार आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी आत्महत्या

मतदारांचे मानले आभार

रवींद्र धंगेकर यांनी शपथ घेण्यापूर्वी कसबा मतदारसंघातील सर्व नागरिकांचे आभार मानले. ते म्हणाले कि प्रथम कसबा मतदारसंघातील सर्व मतदारांना नमस्कार करतो.

सभागृहात Who Is Dhangekar च्या घोषणा

पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘Who Is Dhangekar?’, असा खोचक प्रश्न पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत केला होता. रवींद्र धंगेकरांना कमी लेखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न केला होता. रवींद्र धंगेकर निवडून आल्यांनतर हा प्रश्न मोठा चर्चेचा विषय ठरला. आज सभागृहात शपथ घेत असताना विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाला खिजवण्यासाठी हू इज धंगेकरच्या घोषणा देण्यात आल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube