पुण्याचे पोलीस आयुक्त कुणाचेही ऐकत नाहीत, ते फक्त…रोहित पवारांनी काय सांगितलं?

Rohit Pawar on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारलं तर शहराचं वाटोळं होईल, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

Rohit Pawar on Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारलं तर शहराचं वाटोळं होईल

Rohit Pawar on Devendra Fadnavis as Pune Guardian Minister: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे आता शहराच्या पालकमंत्रिपदावरून राजकीय वाद रंगू लागला आहे. पुण्याची कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुण्याचं पालकत्व स्वीकारावं, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या भूमिकेला विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारलं तर शहराचं वाटोळं होईल, असा टोला त्यांनी लगावला. त्याऐवजी विद्यमान पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना अधिक ताकद द्यावी किंवा पुण्यासाठी एखादा सक्षम पालकमंत्री नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.

‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता नगरी बनत आहे’; सुषमा अंधारेंचा पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून घणाघात

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला. अजितदादांचा प्रशासनावर वचक होता आणि त्यांचा वेगळा दरारा होता. त्यामुळे त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असं ते म्हणाले. सध्याच्या पुण्याच्या पालकमंत्र्यांना अजितदादांप्रमाणे काम करता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची अद्याप सुरुवात आहे. पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आमदार आणि खासदारांनी त्यांना मदत केली पाहिजे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

 ‘फडणवीसांच्या हातात पुण्याची जबाबदारी दिली तर परिस्थिती आणखी बिघडेल’

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांना राज्याच्या गृहखात्याचं अपयश जबाबदार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यांचं खातं गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असेल, तर त्यांच्याकडे पुण्याचं पालकत्व देऊन काय साध्य होणार? उलट त्यांच्याकडे ही जबाबदारी दिल्यास शहराचं वाटोळं होईल, असं ते म्हणाले.

Health Insurance New Rules : आता क्लेम नाकारताच कंपन्यांना द्यावे लागणार कारण….

सुनेत्रा पवार यांनाच अधिक अधिकार आणि ताकद द्यावी. त्यांना काम करणं शक्य नसेल, तर पुण्यासाठी एखादा कार्यक्षम व्यक्ती पालकमंत्री म्हणून नियुक्त करावा, अशी पर्यायी भूमिका त्यांनी मांडली.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांवरही निशाणा

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून रोहित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही लक्ष्य केलं. पोलीस आयुक्त कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचं किंवा पुणेकरांचं ऐकत नाहीत, ते केवळ देवेंद्र फडणवीस यांचंच ऐकतात, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पुण्यातील परिस्थिती बिघडत असल्याचं सांगत पोलीस आयुक्त बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘मी कोणाची लेक आहे, हे विसरू नका’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

दरम्यान, शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेली गोळीबार आणि हल्ल्याची घटना तसेच पुण्यातील इतर गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी पुण्याची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली होती. मात्र, रोहित पवार यांनी त्याला विरोध करत सुनेत्रा पवारांना ताकद देण्याची भूमिका घेतल्याने आता पक्षांतर्गत मतभेदांचीही चर्चा सुरू झाली आहे.

follow us