Shirur Lok Sabha : शिवाजीराव आढळराव की अमोल कोल्हे? विजयाचं गणित असं सुटणार…

  • Written By: Published:
Shirur Lok Sabha : शिवाजीराव आढळराव की अमोल कोल्हे? विजयाचं गणित असं सुटणार…

shirur Lok Sabha : Shivajirao Adhalrao or Amol Kolhe? The calculation of victory :उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय. तसाच शिरुर लोकसभा मतदारसंघही दोघांसाठी प्रतिष्ठेचा बनलाय. या मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील /strong>आणि शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात तुल्यबळ लढत झाली. या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याचं गणित हे शहरी भाग असलेल्या हडपसर आणि भोसरी, या दोन विधानसभा मतदारसंघावर अवलंबून आहे. यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आढळरावांना एक लाख मतांचं लीड मिळवून देण्याचा दावा केला. लांडगे यांनी आपला दावा यशस्वी करून दाखवला तर आढळराव पाटील हे पुन्हा खासदार होतील. पण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ देखील महत्त्वाचे आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघांसाठी 54 टक्के मतदान झालंय. या मतदारसंघातील विधानसभानिहाय गणित समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा…

पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, अजित पवार गटाचा टोला

सर्वात आधी जुन्नरचं गणित बघू. जुन्नर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 81 हजार 584 मतदान झालं. म्हणजेच 56 टक्के मतदान झालं. जुन्नर हा अमोल कोल्हे यांचा बालेकिल्ला. त्यांचं घर नारायणगाव इथं आहे. त्यांचं शिक्षणही नारायणगावातच झालं. त्यामुळं त्यांना इथून सहानुभूती आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त लीड मिळू शकते. तर आढळरावांसाठी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपच्या आशा बुचके यांनी मोट बांधली. पण कांदा उत्पादक शेतकरी या मतदारसंघात आहेत. त्याचा फटका हा आढळरावांना बसू शकतो. कांदा प्रश्नासाठी कोल्हे हे अनेकदा आक्रमक झाले आहेत. त्यामुळं आपल्या तालुक्यातील खासदार व्हावा, अशा जुन्नरकरांच्या आशा आहेत. जुन्नरकर हे कोल्हे यांनी लीड देऊ शकतात. त्यामुळं जुन्नरकरांवर कोल्हेंची भिस्त आहे.


एकीकडे पांडव सेना, तर दुसरीकडे कौरव सेना…; फडणवीसांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

कोल्हेंच्या बाजूनं दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे शिरुर. या मतदारसंघात 2 लाख 49 हजार 976 इतकं मतदान झालं. हा मतदारसंघ कोल्हेंसाठी अनुकूल ठरतो. इथून आमदार अशोक पवार यांची साथ कोल्हेंना मिळालीय. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका केल्या आहेत. या विधानसभा मतदारसंघातील वढू बुद्रुक आणि तुळापूर इथं संभाजी महाराजांचं स्मारक होतंय. याचा फायदा कोल्हेंना होईल. जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात शिरुरचा समावेश होता. त्यामुळं शरद पवारांविषयी सहानुभूती असलेला वर्ग या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात माळी समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळं कोल्हे हे आढळरावांना या ठिकाणी रोखू शकतात.

कोल्हे यांना तिसऱ्या विधानसभा मतदारसंघ अनुकूल राहू शकतो तो खेड-आळंदी. या मतदारसंघात 2 लाख 3 हजार 670 इतके मतदान झालं. या मतदारसंघात कांदा उत्पादक जास्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर पडले आहेत. त्यामुळं कांदा उत्पादक हे आक्रमक आहेत. हा मतदार महायुतीच्या विरोधात गेलेला आहे. त्याचा फटका आढळरावांना बसू शकतो. मात्र काही भाग शहरी आहे. त्याचा आढळरावांना फायदा होईल. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप, मनसे यांनी एकत्रित आढळरावांना साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही या ठिकाणी कोल्हे हे आढळरावांना रोखू शकतात किंवा काही मतांनं ते पुढंही राहू शकतात.

आता आढळरावांना कोणत्या विधानसभा मतदारसंघ साथ देतील ते पाहूया…
आढळरावांची भिस्त ही भोसरी, हडपसर, आंबेगाव या विधानसभा मतदारसंघावर आहे. होमग्राउंड असलेल्या आंबेगाव मतदारसंघातून आढळराव पाटलांना किमान 50 हजार मतांच्या लीडची अपेक्षा आहे. या मतदारसंघात 1 लाख 90 मतदान झालंय. कारण पारंपरिक विरोधक दिलीप वळसे पाटील यांची त्यांना साथ आहे. 2019 मध्ये आढळरावांना या मतदारसंघात लीड मिळालं नव्हतं. त्याआधी दोन वेळेस साठ हजारांपेक्षा जास्त लीड आढळरावांना मिळत होतं. वळसेंच्या साथीमुळं आढळरावांना जास्त लीड मिळण्याची अपेक्षा आहे.

आढळरावांची भोसरी मतदारसंघावर जास्त मदार आहे. या मतदारसंघात 2 लाख 72 हजार 539 इतकं विक्रमी मतदान झालं. त्यामुळं भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीची ताकद आढळरावांना लीड देऊ शकते. महेश लांडगे यांनी आढळरावांना एक लाख मतांचं लीड देण्याचा शब्द दिलाय. तो ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर सभेत. हा शब्द खरा ठरला तर भोसरीच्या जीवावर आढळराव पाटील हे चौथ्यांदा खासदार होतील.

तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे हडपसर. हा शहरी मतदारसंघ असून, या मतदारसंघात 2 लाख ७७ हजार मतदान झालंय. इथं पंतप्रधान नरेंद मोदींना मानणारा मोठा वर्ग आहे. याचा फायदा आढळरावांना होईल. इथं चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. पण इथं माळी समाज, मुस्लिम समाज मतदार इथं आहेत. त्यांची मतं कोल्हेंच्या बाजूनं गेल्याचं चित्र आहे. हडपसर, भोसरी, आंबेगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ आढळरावांच्या बाजूनं असल्याचं चित्र आहे. जुन्नर, खेड, शिरुर हे कोल्हेंच्या बाजूनं आहेत. भोसरीत आढळरावांना एक लाखांचं मताधिक्क्य मिळालं तरी आढळराव पाटील हे पन्नास हजार मतांनी विजयी होतील. तर शिरुर, जुन्नर आणि खेड या तीन विधानसभा मतदारसंघात कोल्हेंना चांगलं लीड मिळालं तर ते पंचवीस ते तीस हजार मतांनी निवडून येऊ शकतात. असे अंदाज आलेत. पण मतदारराजांनी कुणाला दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतलाय? हे 4 जूनला इव्हीए मशीन उघडल्यानंतर स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज