विकेंड पार्टींच्या नशेतले राक्षस अजून किती जीव घेणार? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांचा प्रश्न

Vijay Kumbhar : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी होत आहे.

  • Written By: Published:
Vijay Kumbhar

Vijay Kumbhar : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी होत आहे तर काहींचा मृत्यू देखील होत आहे मात्र तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विकेंड पार्टींच्या नशेतले राक्षस अजून किती जीव घेणार? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सामाजित कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हंटले आहे की, विकेंड पार्टीच्या नावाखाली भरदिवसा पुण्यात दारूच्या नशेत गाड्या घेऊन फिरणारे कोणाच्या जीवावर उठतील सांगता येत नाही. 30 नोव्हेंबर राजी कल्याणी नगर Toit रेस्टॉरंट मद्यधुंद चालक परताप दाईगडे याने रेस्टॉरंटच्या एका कर्मचाऱ्याला अक्षरशः चिरडून टाकलं. 30 वर्षीय सत्येंद्र मंडलचे पाय तुटले, शरीराचे दोन तुकडे झाले आणि सर्वात भीषण म्हणजे, हॉटेल मॅनेजरसह उपस्थित एकाही व्यक्तीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पुढे पाऊल टाकले नाही. अतिशय गंभीर अवस्थेत तो अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला.जेव्हा अँब्युलन्स आली, परंतु त्याचा मृत्यू झाला होता. पुण्यातील पोर्शे अपघातानंतरही परिस्थिती जशीच्या तशीच! पार्ट्यांचा उन्माद, रात्री उशिरापर्यंत दारू विक्री, भयानक ड्रायव्हिंग,ना पोलिसांचा धाक, ना कारवाईची भीती. थोड्या दिवसांचं नाटक, दोन–चार पब बंद… आणि पहिलाच खेळ पुन्हा सुरू ! का? याचे कारण एकच, या धंद्यांना राजाश्रय आहे. त्याच दिवशीच्या पहाटेचा आणखी एक भयावह प्रसंग!

रात्री 1:27 वाजता एका तरुणीने Uber बुक केली. MH 12 VF 0395 नंबरची टॅक्सी 1:35 ला आली आणि तिचं दुखःद स्वप्न सुरू झालं. हळू चालवण्याची विनंती केल्यावर ड्रायव्हरचा दमदाटीचा सूर – “तुम्ही थांबा, मी चालवतो.” प्रचंड वेग, धोकादायक ड्रायव्हिंग आणि नंतर सिंबायोसिस सिग्नलवर थेट राँग वेने एअरपोर्टकडे घुसण्याचा प्रयत्न! ड्रायव्हर स्पष्टपणे मद्यधुंद होता. नंतर नियंत्रण सुटलं, गाडी डिव्हायडरवर आदळली, धूर निघाला.ती कसाबसा जीव वाचवून गाडीतून बाहेर पडली. पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, हनुवटी फाटली ,पाय जखमी झाला,कपडे रक्ताने माखले लोकांनी मदत केली.

कुणाल नावाच्या तरुणाने तिला रिक्षाने हॉस्पिटलला नेलं. तरुणीने Uber कडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर, #Uber ने तक्रार न घेता तिचंच अकाउंट ब्लॉक केलं! ड्रायव्हर कोण? नंबर काय? काहीही माहिती दिली नाही. तिने विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! 80 मराठी सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’ साठी

पुण्यातील प्रशासनाला प्रश्न, किती मृत्यू लागतील कारवाईसाठी? पोर्शेचा धडा पुरेसा नव्हता? दारू विक्री, नाइट पब्ज, गुंड ड्रायव्हर्स यांच्यावर नियंत्रण कोणाचे? पुणे सुरक्षित शहर आहे की नशेबाजांची जागीर? #नाइट_लाइफवर_नियंत्रण_कोणाचे #पोर्शेचा_धडा_पुरेसा_नव्हता #पुणे_सुरक्षित_आहे ? #नशेच्या_व्यापाऱ्यांना_कोणाचे_संरक्षण ? #पब्ज

follow us