मला खासदार व्हायचंय हे नक्की पण, माझ्यावर अन्याय झाला का? हे अजितदादाच सांगतील

  • Written By: Published:
मला खासदार व्हायचंय हे नक्की पण, माझ्यावर अन्याय झाला का? हे अजितदादाच सांगतील

पुणे : लोकसभा आण राज्यसभेला डावलण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्याला खासदार व्हायचं आहे पण, पक्ष म्हटल्यावर अनेक गोष्टी घडतात. पक्षात डावावलं जात आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, पक्षात सगळ काही गोष्टी मनासारखं होत नाही असे उत्तर भुजबळ यांनी दिले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना तिकीट देणे म्हणजे घराणेशाही नाही का? या प्रश्नावर एका शब्दात उत्तर दिले.

राष्ट्रवादीत ठिणग्या! मुश्रीफ हे सिनियर, त्यांचे ऐकले पाहिजे; छगन भुजबळांचा टोमणा

दिल्लीतून आदेश येताच मी तयारीला लागलो होतो

यावेळी भुजबळांनी लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती. पण, महिनाभर होऊनही उमेदवारी जाहीर न झाल्याने मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अर्ज भरण्याच्या एका दिवशीपूर्वी जाहीर झाला. त्या सर्वांचे परिणाम जय पराजय झाला, असे स्पष्टपणे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठा ओबीसीमधूनच आरक्षण घेणार; नेत्यांनी विरोध करण्यापेक्षा सहकार्य करावं -जरांगे पाटील

माझ्यावरील अन्यायाचा प्रश्न अजितदादांना विचारा

भुजबळांना यावेळी राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही याबद्दल नाराजी आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, मला राजकारणात 57 वर्ष झाले आहेत. अनेकवेळा असे झाले पाहिजे झाले असे वाटते. पण नेहमी मनासारखे होत नाही. काहीवेळा तडजोडी कराव्या लागतात. दोन्ही वेळेस अन्याय झाला का? याचे उत्तर अजितदादांनाच विचारा असे ते म्हणाले.

“अहंकाऱ्यांना प्रभू श्रीरामांनी 240 वरच रोखलं”; आरएसएस नेत्याचा भाजपला खोचक टोला

400 पारचा नारा धोका ठरेल सांगितले होते

यावेळी भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत 400 पारची घोषणा धोका ठरेल असे मी सांगितले होते असे ते म्हणाले. फटका बसल्यानंतर आता एकनाथ शिंदे सांगत आहेत की, या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला. आता लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतर संघाकडून नाराजी व्यक्त होत आहे. संघाचे नाराज होणे स्वाभाविक असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज