Pooja Khedkar : पूजा खेडकर पुणे व्हाया वाशिम.. रुजू होताच म्हणाल्या, सॉरी मी..

Pooja Khedkar : पूजा खेडकर पुणे व्हाया वाशिम.. रुजू होताच म्हणाल्या, सॉरी मी..

Pooja Khedkar : वादग्रस्त परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) अखेर आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून खेडकर यांची बदली वाशिमला (Washim) करण्यात आली होती. त्यानुसार आज त्या वाशिम कार्यालयात हजर झाल्या आहेत. पूजा खेडकर यांची संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली (UPSC) निवड त्यांच्या विविध अवाजवी मागण्यांमुळे त्या वादात सापडल्या आहेत.

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या थाटाला पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खासगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे अशा थाटात खेडकर यांचा पुण्यात वावर होता. शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणीच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केली होती. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली.

पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप?

वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

काय म्हणाल्या पूजा खेडकर?

वाशिमला आल्यानंतर आधी त्यांनी येथील जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या मुद्द्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सॉरी असे म्हणत त्यांनी या वादावर अधिक बोलण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तुम्हाला काहीही सांगण्यासाठी मी अधिकृत व्यक्ती नाही. सरकारी नियमांनुसार या प्रकरणावर काही बोलण्याची परवानगी मला नाही. त्यामुळे सॉरी यावर मी काही बोलू शकत नाही. आज मी वाशिम येथे रुजू झाले असून येथे काम करण्यासाठी मी अभिलाषी आहे, असे पूजा खेडकर यांनी सांगितले.

कोट्यावधींची प्रॉपर्टी तरी नॉन क्रिमिलेअरमधून परीक्षा; IAS पूजा खेडकरा्ंवर थेट केंद्रातून कारवाई होणार

दरम्यान, पूजा खेडकर या आयएएस झाल्या तरी कशा, त्यांनी अपंगत्वाची जी कागदपत्रे सादर केली ती खरी आहेत का, याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. यूपीएससीची परीक्षा देताना त्यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड अँड मेंटल इलनेस असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारे परीक्षा देत त्यांनी विशेष सवलत मिळवत आयएएस झाल्याचे आता समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube