चालायचं शिकवणाऱ्यालाच लाथा मारायच्या का? ठाकरेंचा अजितदादांना खोचक सवाल

चालायचं शिकवणाऱ्यालाच लाथा मारायच्या का? ठाकरेंचा अजितदादांना खोचक सवाल

Udhav Thackeray On Ajit Pawar : ज्याने बोट धरून चालायला ,शिकवले त्यांना लाथा मारायच्या का? असा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक सवाल केला आहे. दरम्यान, पुण्यातील बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

त्यांच्या उद्योगांवर बोललो तर त्यांचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; शरद पवार धनंजय मुंडेंवर संतापले

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याने बोट धरून चालायला, शिकवलं त्यांना लाथा मारायच्या का? बोट सोडलं असतं तर चालता आलं नसतं, पुढे जाता आलं नसतं, अजूनही पुढे जाता येणार नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना चिमटा काढला आहे. तसेच मोदींच्या घरगडी निवडणूक आयोगाकडून आमच्या गाण्यावरही आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदी समुद्राच्या बुडाशी जाऊन आले पण धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीला गेलेले नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलीयं.

Happy Patel: शाहरुख नंतर आता आमिर खान बनणार ‘डॉन’; खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

भाजपला देशाची घटना बदलायची आहे, म्हणूनच 400 पारचं बहुमत हवं आहे. देशाची घटना एका दलित कुटुंबातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे, गोमुत्रधारी हिंदुत्ववाद्यांना मान्य नाही. त्यामुळेच भाजपला बहुमत पार करुन संविधान बदलायची आहे, मात्र, संविधान बदलण्याची तयारी भाजपने केल्यास उभा देश पेटून उठणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

माझ्या सेनेला नकली सेना म्हणता, तर…
माझ्या सेनेला नकली सेना म्हणता, अन् तुमच्यासोबत गद्दार अन् गाढवांची टोळी त्यांना सेना मानता का? आज जर न्याय लावला तर तुम्ही जे बोलला होतात नॅशनल करप्ट पार्टी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची दोन्ही चिन्हे तुमच्याकडेच आहेत तर मग ही पक्ष चिन्हे कशी चालतात तुम्हाला? एक अकेला सबपे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे.

‘वखवखलेला आत्मा’ गुजरातमध्ये जन्मला :
महाराष्ट्रात आज तुम्हाला ठाण मांडून बसण्याची वेळ आलीयं पण महाराष्ट्र गद्दार नाही. राज्याची परंपरा शूरांना वंदन करायची आहे. शूर आम्ही वंदीले…पण चोरामी वंदीले असं भाजपचं सुरु आहे. तुम्हा चोरांना ते वंदन करतात. एक वखवखलेला आत्मा गुजरातमध्ये जन्मलेला तो आग्रामार्गे महाराष्ट्रावर चालून आला. शिवरायांचं स्वराज्य चिरडून टाकायला आला होता. 57 वर्षे तो महाराष्ट्रात आला होता, त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल, अशी सडकून टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube