पुण्यात १२ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी; ३० ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत नियम लागू

पुण्यात १२ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी; ३० ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत नियम लागू

Pune Traffic Rules : पुणे शहरातील 30 प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात सोडवण्यात येणार आहे. (Pune Traffic) पुणे शर वाहतूक पोलिसांनी काल अधिसूचना जाहीर करून शहरातील गंभीर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण उपाययोजना करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर

बंदीचे वाहन

या बंदीचा नियम ट्रक, डंफर आणि इतर अवजड वाहनांवर लागू होईल. पुण्यातील ३० प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या वाहनांवर बंदी लागू राहील.

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईला यलो अलर्ट, राज्यातील इतर जिल्ह्यांत काय परिस्थिती?

या ठिकाणांचा समावेश

संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक, सेव्हन लव्ह्स चौक, पंडोल अपार्टमेंट चौक, खणे मारुती चौक, पावर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमन चौक, शास्त्री नगर, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबेल चौक, लुल्लानगर ते गोळीबार मैदान, लुल्ला नगर ते गंगाधाम, पुष्पा मंगल चौक, राजास सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, अभिमनाश्रे बाणेर आणि अभिमनाश्री पाषाण.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube